गोंदिया :गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील (Deori Taluka of Gondia District) पालांदूर (जमीनदारी) येथुन पाच किलोमीटर अंतरावर चुमली हे गाव (Chumali Village) आहे. यागावी जात असताना पुन्हा एका व्यक्तीचा चुमली (Chumali River) नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहुन, मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना, आज सकाळच्या सुमारास घडली. मात्र, प्रशासन सातत्याने दुर्लक्ष (neglect of the administration) करीत आहे.
देवरी तालुक्यातील पांलादुर (जमीनदारी) पासुन चुमली गावाला जाण्याकरिता रस्ताच नाही. विशेषता चुमली गावात जाण्यासाठी, चुमली नदी ओलांडुनच गावातील नागरीकानां अनेक वर्षापासून ये-जा करावी लागत आहे. यामुळे सतत वाहणाऱ्या नदीच्या पाण्यातुन जाण्यास, पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेकांचे जिव या चुमली नदीत गेले आहे. याचीच दखल घेत काही दिवसा अगोदरच जिल्हाधिकारी व संपुर्ण जिल्हा प्रशासनाने त्या चुमली गावातील नागरीकांची भेट घेतली. त्या नदिची पाहणी केली. व लवकरच नागरीकांना ये - जा करण्याचा मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. पंरतू आज पुन्हा सकाळच्या सुमारास चुमली गावातील एका व्यक्तीचा त्या नदितील पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेल्याने, मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव मोरेश्वर देवाजी सलामे (३८ वर्षे, मु. चुमली) असुन हा व्यक्ती पालांदुर (जमीनदारी) येथुन, चुमली गावी परत जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनेची नोंद चिचगड पोलिस सस्टेशनला करण्यात आली आहे. तर मृतदेह ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला.