भंडारा - जिल्हात आता घरपोच मद्यविक्रीला भंडारा जिल्हाधिकारी एम जे प्रदीपचंद्रन यांनी परवानगी दिली कंटेनमेंट झोन वगळता जिल्हात सर्वच ठिकाणी मद्य विक्री करता येणार आहे . यामुळे जिल्हातील मद्यशौकीनाच्या आनंदात भर पडली आहे.
भंडाऱ्यात शुक्रवार पासून घरपोच मद्य विक्री शक्य - घरपोच मद्य विक्री
वाईन शॉप आणि बियर शॉप मालकांना घरपोच मद्यविक्रीला परवानगी दिली गेली आहे. मात्र, असे असले तरी घरपोच मद्यविक्रीला जिल्हा प्रशासनाद्वारे लावण्यात आलेल्या जाचक अटीने मद्यविक्रेत्यांची शासनाच्या या उपक्रमाला नापसंती दर्शविली आहे.
वाईन शॉप आणि बियर शॉप मालकांना घरपोच मद्यविक्रीला परवानगी दिली गेली आहे. मात्र, असे असले तरी घरपोच मद्यविक्रीला जिल्हा प्रशासनाद्वारे लावण्यात आलेल्या जाचक अटीने मद्यविक्रेत्यांची शासनाच्या या उपक्रमाला नापसंती दर्शविली आहे. आधीच जिल्हात केवळ एकच वाईनशॉप सुरु असल्याने त्या मद्यविक्रेता वाढता ताण लक्षात घेता तो या उपक्रमात सहभागी होतो का हा प्रश्न जिल्हातील मद्यशौकीनांना पडला आहे.
जिल्हाधिकारी एम जे प्रदीपचंद्रन यांनी 6 मे ला आदेश पारित करत जिल्हातील मॉल,व्यापारी संकुल, बाजारपेठ वगळता ग्रामीण आणि शहरी भागातील वाईन शॉप ,बियर शॉप आणि देशी दारू विक्रीला परवानगी दिली. जिल्हात केवळ एकच वाईन शॉप साकोलीला सुरु झाले असून मोजकेच बियर शॉप सुरु झाले आहे. त्यात काल 14 मेच्या नवीन आदेश पारित करत जिल्हात घरपोच मद्यविक्रीला देण्यात आली आहे. यात सकाळी 11 ते 4 वाजतापर्यंत घरपोच मद्यविक्री करता येणार आहे. त्यात डिलिव्हरी बॉय याला 24 युनिट पेक्षा जास्त मद्याची वाहतूक करता येणार नसून एम आर पी व्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. शिवाय वेळो वेळी डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी करावी लागणार असल्याच्या अटीशर्तीमुळे मद्यविक्रेत्यांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. जिल्ह्यातील मद्यविक्रेते शासनाच्या या नवीन उपक्रमात सहभागी होतात का हे बघणे विशेष ठरेल.