भंडारा - पाच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सकाळी 10 नंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला.
पावसाळा सुरू झाला असला तरी नियमित पाऊस बरसत नाही. मागच्या आठवड्यात देखील जिल्ह्यातील एक-दोन तालुक्यात काहीच प्रमाणात पाऊस बरसला. मात्र त्याचेही प्रमाण अल्प होते. पाऊस येत नसल्यामुळे दमट वातावरण निर्माण होऊन उष्णता वाढली होती. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सकाळी दहानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतात पाणी साचले असून त्यामुळे रोवणीला गती येईल.भंडारा : पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बरसला पाऊस, रोवणीला मिळणार गती - bhandara rains
पाच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सकाळी 10 नंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला.
खरीप हंगाम सुरू असताना पावसाची गरज बळीराजाला भेडसावत होती. काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भात पेरण्यांनंतर अन्य पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून रहावे लागत होते. मात्र आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. तसेच वातावरणात गारवा पसरल्याने नागरिक सुखावले आहेत.
सध्या शेतकरी शेतात रोवणी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र रोवणीसाठी आवश्यक असलेला पाऊस अजूनही बरसला नसल्याने केवळ सिंचनाच्या सुविधेवर पाणी पुरवठा सुरू होता.
भंडाऱ्यात एक लाख 61 हजार 693 हेक्टरवर भात लागवड होते. मात्र आवश्यक पाऊस न बरसल्याने केवळ पाच टक्के रोवणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे निरंतर आणि जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहे.