महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात अवकाळी पाऊस; नागरिकांची तारांबळ

हवामान खात्याने 5 ते 8 फेब्रुवारी पर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली होती. आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

heavy-rain-in-bhandara
भंडाऱ्यात अवकाळी पाऊस

By

Published : Feb 6, 2020, 12:24 PM IST

भंडारा-भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासह पूर्वविदर्भात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर आज (गुरुवारी) सकाळपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. अगदी सकाळपासून काळोख ढगाळ वातावरणात पावसाची रिमझिम सुरू होती. मात्र, या अचानक आलेल्या पावसाने रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे.

भंडाऱ्यात अवकाळी पाऊस

हेही वाचा-निर्भया प्रकरण : दोषी अक्षय ठाकुरची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

ग्रामीण भागात लाखंदूर, चौरास भागात पहाटे पासूनच हलक्या स्वरूपाच्या पावसाने सुरुवात केली. तर शहरात सकाळ पासून ढगाळ वातावरणामुळे काळोख पसरला होता. साडेआठ नंतर शहरातही पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

हवामान खात्याने 5 ते 8 फेब्रुवारी पर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली होती. पावसामुळे जिल्ह्यातील तापमान घट झाली आहे. या पावसाचा पिकांनाही फटका बसला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details