महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूर्व विदर्भात २४ तासात तीव्र उष्णतेची लाट, जिल्हा प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्याच्या सुचना

मागील आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. सायंकाळी ४० ते ४१ अंश सेल्सिअस तापमान राहत होते. मात्र, २३ तारखेपासून तापमानात अधिकच वाढ होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा

By

Published : Apr 22, 2019, 5:07 PM IST

Updated : Apr 22, 2019, 6:13 PM IST

भंडारा - पूर्व विदर्भात येत्या २४ तासात तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या वर जाणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे येत्या ३ दिवसात नारिकांनी विशेष काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांना सर्तकतेच्या सुचना देताना जिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास

नुकताच झालेल्या पावसामुळे अरबी सागर आणि बंगालच्या खाडी दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या २४ तासात पूर्व विदर्भात तीव्र उष्ण लहरी प्रवाहीत होणार आहेत. त्यामुळे २३ ते २६ एप्रिलपर्यंत भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्हातील तापमानात कमालीची वाढ होणार आहे.

उकाड्यापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनानी दिलेल्या सुचना -

  • दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
  • सोबत पाण्याची बाटली बाळगावी.
  • लिंबू सरबत, लस्सी, ताक यासारखे थंड पदार्थ प्यावे.
  • उष्माघाताचा त्रास होईल, असे पदार्थ टाळणे.
  • लहान मुळे, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.

विदर्भात दरवर्षीच तापमान सर्वाधिक असते. मात्र, मागील आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. सायंकाळी ४० ते ४१ अंश सेल्सिअस तापमान राहत होते. मात्र, २३ तारखेपासून तापमानात अधिकच वाढ होणार आहे.

Last Updated : Apr 22, 2019, 6:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details