पालकमंत्री परिणय फुके यांचे जिल्ह्यात जंगी स्वागत - minister
परिणय फुके यांना वने, सार्वजनिक बांधकाम व आदिवासी विकास राज्यमंत्री पद तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
भंडारा- भंडारा-गोंदिया विधानपरिषदचे आमदार परिणय फुके यांना नुकतेच राज्यमंत्री पद मिळाले. तसेच शुक्रवारी रात्री त्यांना भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली. पालकमंत्री झाल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच फुके भंडारा जिल्ह्यात आले होते. यानिमित्ताने विविध ठिकाणी त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
परिणय फुके यांना सार्वजनिक बांधकाम, वने, आदिवासी विकास राज्यमंत्री पद तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. सुरुवातीला भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील पहिल्या गावात त्यांचे स्वागत केले गेले. नंतर विविध ठिकाणी स्वागत करीत शहरात त्यांचे आगमन झाले. त्यांनी त्रिमूर्ती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण केले. नंतर गांधी चौकात फटाके फोडून, ढोल ताश्याने त्यांचे स्वागत केले गेले.