भंडारा - परतीच्या पावसाने धानशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शनिवारी पालकमंत्री परिणय फुके आणि खासदार सुनील मुंढे यांनी लाखणी, लाखांदूर आणि साकोली तालुक्यातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. फुके यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांची बैठक घेतली व त्यांना तातडीने सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतीचे आणि शेतकऱ्यांचे आकडे देण्याचे आदेश दिले.
परतीच्या पावसासुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसान पाहता महाराष्ट्र शासनाने १० हजार कोटींची घोषणा केली आहे. येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असे परिणय फुके यांनी पाहणी दरम्यान सांगितले. परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील विविध भागातील शेत पिकांचे मोठे नुकसान केले आहे. भंडारा जिल्हा हा धान शेतीचा जिल्हा आहे. आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी हलका धान कापनीला आला असतानाच अचानक परतीच्या पावसाने वादळवऱ्यासह हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले.
८ महिने अथक प्रयत्न करून विविध संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी जे पीक उभे केले होते ते पूर्णपणे भुईसपाट झाले. इतकेच नव्हे तर, जे धान कापून शेतात ठेवले होते, ते देखील पाण्यात भिजले. त्यामुळे त्यांना कोंब फुटली, तर काही धान पूर्णपणे खराब झाले. या शेतकऱ्यांना आता सरकारकडून नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी तीन दिवसाआधी साकोलीचे नवनिर्वाचित आमदार नाना पटोले याना देखील सरसकट १५००० रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती.
फुके यांनी धानाची पाहणी करून शेतकऱ्यांशी केली चर्चा