महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

होळीचा गोडवा कायम ठेवणाऱ्या 'गाठी' निर्मितीबाबत 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट - होळी सणाचे महत्व

होळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साह आणि आनंद देणारा सण. होळीतील गोडवा कायम ठेवण्याचा काम करते 'गाठी'. साखरेच्या पाकापासून बनलेली पांढरीशुभ्र गाठी नुसती खाण्यासच चवदार नसते, तर होलिका दहन करताना नैवेद्य म्हणून देखील तिचा मान आहे.

गाठी
गाठी

By

Published : Mar 9, 2020, 2:46 AM IST

Updated : Mar 9, 2020, 12:48 PM IST

भंडारा - राग-लोभ विसरुन रंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी. होळीत गाठीचा मान सर्वश्रृत आहे. मात्र, कधीकाळी शेकडो घरांमध्ये तयार होणारी गाठी आता भंडारा शहरातील एकाच परिवारापर्यंत मर्यादीत राहिली आहे.त्यांच्या कष्टाने निर्माण झालेल्या गाठीमुळे भंडारा जिल्ह्यातील होळीच्या सणातील हा गोडवा कायम आहे. याच गाठींच्या निर्मिती संदर्भातील ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट.

होळीचा गोडवा कायम ठेवणाऱ्या 'गाठी' निर्मितीबाबत 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट

होळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्साह आणि आनंद देणारा सण. होळीतील गोडवा कायम ठेवण्याचा काम करते 'गाठी'. साखरेच्या पाकापासून बनलेली पांढरीशुभ्र गाठी नुसती खाण्यासच चवदार नसते, तर होलिका दहन करताना नैवेद्य म्हणून देखील तिचा मान आहे. तसेच गुलाल लावून 'बच्चे कंपनीं'ला गाठीची माळ दिली जाते.

भंडारा शहरात कधीकाळी शेकडो ठिकाणी गाठी निर्मितीचे कारखाने होते. कष्टाचे काम, त्यातही मिळणारा नफा कमी असल्याने हळूहळू हे कारखाने बंद झाले.
शहरात आज सुनील पचारे यांचा एकमेव व्यवसाय शिल्लक आहे. आजोबांपासून सुरु असलेला परंपरागत व्यवसाय त्यांनी जोपासलेला आहे. सुरुवातीला वडीलधारी माणसांनी इतरांकडे कारागीर म्हणून काम केले. मात्र, मागील तीस वर्षापासून सुनील यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात गाठया निर्मितीचे कारखाना सुरू केला आहे. या कामात त्यांच्या कुटुंबातील सर्वच लहान-मोठे मंडळी मदत करतात. सोबतच त्यांनी तीन महिला आणि एक पुरुष कारागिराला सुद्धा या व्यवसायातून रोजगार दिला आहे.

हेही वाचा -VIDEO : .. त्यामुळे मी कोणाशीही हस्तांदोलन करत नाही, अजित पवारांनी केला खुलासा

दरम्यान, गाठी निर्मीतीला महाशिवरात्रीपासून सुरुवात केली जाते. शहरातील किराणा दुकानदार त्यांच्या आवश्यकतेनुसार गाठया बनविण्याचे ऑर्डर देतात. ऑर्डरनुसार गाठयांची निर्मिती केली जाते. या 20 ते 25 दिवसाच्या वेळात जवळपास चारशे किलो साखरेपासून गाठयांची निर्मिती केली जाते. खर्च वजा जाता 40 ते 45 हजार रुपयांचा नफा त्यांना होतो, असे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलाताना सांगितले.

गाठी तयार करण्याची पाककृती -

एका मोठ्या कढाईत साखर विरघळून कच्चा पाक तयार केला जातो. हा पाक थंड करून ठेवला जातो. नंतर कच्चा पाक पुन्हा शिजवला जातो. धगधगत्या भट्टीवर जवळपास पंधरा मिनिटे शिजवल्यानंतर लाकडी साच्यांमध्ये हा पाक घातला जातो. या अगोदर या लाकडी पाट्याना स्वच्छ धुऊन त्याच्यामध्ये धागे ठेवले जातात. एकदा या लाकडी पाटात पाक टाकला म्हणजे गाठयांची निर्मिती पूर्ण होते. 25 ग्राम वजनापासून तर अर्धा पावाच्या गाठ्या तयार केल्या जातात.

या व्यवसायातून मिळणारा नफा खूप कमी असल्यामुळे अनेक निर्मात्यांनी हे काम बंद केले आहे. मात्र, परंपरा टिकून ठेवण्यासाठी पचारे परिवार हा व्यवसाय करीत आहे. त्यामुळेच शुद्ध गाठ्यांचा गोडवा भंडारा शहरातील अनेकांना मिळत आहे.

हेही वाचा -'अलग ये मेरा रंग है', अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला तासाभरातच मिळाले मिलियन व्हिव्ज

Last Updated : Mar 9, 2020, 12:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details