भंडारा -तुमसर तालुक्यात एका कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. अमित उर्फ बाबू बॅनर्जी (वय, 30) असे मृताचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. दरम्यान, तुमसर मध्ये सतत गँगवार होत असून हत्येच्या घटना घडत असतात, यामुळे हत्येचा तालुका म्हणून तुमसर कुप्रसिद्ध होत चालला आहे.
संत जगनाडे नगरातील रहीवासी बाबू बॅनर्जी एक महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यात जामीनावर बाहेर आला होता. कलम 297 आणि 307 च्या आरोपा खाली जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 5 वर्षाची शिक्षा सुनावली होती, आता पर्यंत त्याच्यावर विविध 8 गुन्ह्याची नोंद आहे.
हेही वाचा -भारत आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये १.३ ट्रिलियन डॉलर्सची करणार गुंतवणूक - पंतप्रधान मोदी
सायंकाळी व्यायाम शाळेतून बाहेर पडल्यानंतर तो नेहमीच्या मार्गाने घराकडे निघाला होता. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात मारेकरी भारती कन्या शाळेच्या परिसरालगत लपून होते. यावेळी त्यांनी बाबूला थांबवले आणि त्यांच्यात शाब्दीक बाताबाची झाली. यानंतर आरोपींनी धारदार शास्त्राने बाबूच्या डोक्यावर आणि पोटावर जबर वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा -ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही - मुख्यमंत्री
या घटनेतील मारकऱ्यांचा अजून कोणताही तपास लागलेला नाही. मात्र, या घटनेसंदर्भात मृत बाबू हा मुख्य फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शी होता, त्यामुळे त्याची हत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर शासकिय रुग्नालयात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान, मारेकरी अद्दाप पसार असून तुमसर पोलिसांचे पथक त्या आरोपींच्या मागावर असल्याची माहीती पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी दिली.