गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या तिन्ही जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Gadchiroli naxal attack
एका सजविलेल्या गाडीवरून दयानंद , नितीन आणि भुपेश यांची अंत्ययात्रा त्यांच्या गावकऱ्यांनी स्मशान भूमीवर नेली. या ठिकाणी शासकीय इतमामात बंदुकीच्या ३ फैरी झाडून शहीदांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.
![गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या तिन्ही जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3174377-thumbnail-3x2-maqrtyrjjjj.jpg)
दयानंद शहारे, नितीन घोरमारे, भुपेश वालदे यांचे पार्थिव नेताना
भंडारा- गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात शहीद झालेले भंडारा जिल्ह्यातील तिन्ही जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दयानंद शहारे, नितीन घोरमारे, भुपेश वालदे यांचे पार्थिव गावात दाखल होताच अंत्यदर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
दयानंद शहारे, नितीन घोरमारे, भुपेश वालदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार