भंडारा - जिल्ह्यात एका खाजगी आरोग्य शिबिरादरम्यान कालबाह्य औषधांचे वितरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील आसगाव मध्ये संबंधित प्रकार घडला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषी लोकांवर कारवाईची मागणी केली आहे. तर हे शिबीर खाजगी डॉक्टरांनी आयोजित केले असून आमच्या आरोग्य विभागामार्फत झालेल्या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे आसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आसगाव येथे मोफत आरोग्य शिबिरात वाटले कालबाह्य आय ड्रॉप - cm uddhav thackrey
रविवारी एका खाजगी संस्थेद्वारे आसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रक्तदान शिबिर व निःशुल्क नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तेथे त्यांना आय ड्रॉपचे वितरण करण्यात आले. त्या ड्रॉप वर मे 2021 ही शेवटची तारीख होती. त्याने यासंबंधित तक्रार केली.
रविवारी एका खाजगी संस्थेद्वारे आसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रक्तदान शिबिर व निःशुल्क नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील लोकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या शिबिरामध्ये अनेक रुग्णाच्या डोळ्यांची तपासणी आणि आय ड्रॉपचे वितरण करण्यात आले.
एका युवकामुळे समजली घटना
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी 2 ऑगस्टला हे औषध कालबाह्य असल्याचे काही लोकांना दिसले. त्या ड्रॉप वर मे 2021 ही शेवटची तारीख होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता गावातील एका युवकाने यांची तक्रार टिवटरद्वारे थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्भव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. या नंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.