भंडारा- बर्ड फ्लूच्या सावटातही जिल्ह्यात भुरट्या चोऱ्यांचे प्रकार सुरू आहेत. सिरसोली येथून 84 हजारांच्या 392 कोंबड्यांची चोरी झाली आहे.
कोंबड्या चोरी झालेल्या घटनेची आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. सध्या बर्डफ्लूमुळे कोंबड्यांचे मांस खाण्याऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. कोंबड्याचे दर घसरल्याने आधीच पोल्ट्री फार्म व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यातही जर कोंबड्यांच्या चोऱ्या सुरू झाल्या तर या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
बर्डफ्लूच्या सावटातही पोल्ट्री फार्ममधून 392 कोंबड्या लंपास हेही वाचा-आरबीआयचा दणका; सेवा विकास सहकारी संस्थेला ठोठावला ५५ लाखांचा दंड
रात्रीला कुलूप तोडून केली चोरी
बबन गोमाजी मुटकुरे (रा. सिरसोली) यांनी भाड्याने घेतलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये विविध जातींच्या कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसाय सुरू केला. घटनेच्या दिवशी संजीव मुटकुरे हे रात्री अकरा वाजता पोल्ट्री फार्मवरून कोंबड्यांची देखभाल करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोल्ट्री फार्मवर आले असता त्यांना पोल्ट्री फार्मच्या मुख्य दाराला कुलूप तुटलेले दिसले. पोल्ट्री फार्ममध्ये ठेवलेल्या बऱ्याच कोंबड्या चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात लेअर जातीच्या 200 कोंबड्या, पॅरेट जातीच्या 125 कोंबड्या, कॉकरेल जातीच्या 42 कोंबड्या, बॉयलर जातीच्या 30 कोंबड्या अश्या सुमारे 392 कोंबडया आणि इलेक्ट्रिक वजन काट्याचा मदर बोर्ड असा एकूण 86 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे पोल्ट्री फार्म चालक बबन मुरकुटे यांनी सांगितले.
हेही वाचा-शेअर बाजारात चौथ्या दिवशीही तेजी; ३५८ अंशाने वधारला निर्देशांक
बर्ड फ्लूच्या सावटातही चोरट्यांकडून चोरीचा प्रताप
सध्या बर्ड फ्लू सुरू असल्याने कोंबड्या खाणाऱ्यांची संख्या मंदावली आहे. त्यामुळे कोंबड्यांचे दरही कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत या कोंबड्यांना किती किमतीत विकावे की अजून काही दिवस त्यांना पोसावे या विवंचनेत सध्या पोल्ट्री फार्म मालक आहेत. पण, अशा परिस्थितीतही चोरट्याने कोंबड्या चोरण्याचा प्रताप केला आहे. या कोंबड्या विकण्यासाठी चोरल्या की बबन मुरकुटे यांचे केवळ आर्थिक नुकसान करण्याच्या उद्देशाने ही चोरी केली हे पोलीस तपासानंतर समोर येणार आहे. आंधळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नायक उमेश वनके यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले.