भंडारा - मागील तीन दिवसांपासून तापणात कमालीची घट झाल्याने कडाक्याची थंडी वाढली आहे. यामुळे एकाच दिवशी चार व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीने गारठून मृत्यू झाला. ही घटना
सोनी/संगम येथे लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना शनिवारी (दि.28) उघडकीस आली आहे.
भंडारा : कडाक्याच्या थंडीने चौघांचा मृत्यू - मंडई
कडाक्याच्या थंडीमुळे भंडारा जिल्ह्यात चौघांचा गारठून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सुमित्रा जनार्दन दुपारे (वय 70 वर्षे), ताराबाई प्रितमसिंह पवार वय (वय 68 वर्षे, दोघे रा.सोनी/संगम) इंदीराबाई दिवाकर हुळे (वय 67 वर्षे, रा. सरांडी/बुज), तिमा बकाराम मेहंदळे (वय 70 वर्षे, रा.आसोला) अशी मृतांची नावे आहेत.
संपूर्ण झाडीपट्टीत सोनी या गावात प्रसिद्ध मंडईचे आयोजन केले जात असून, डिसेंबर महिण्याच्या शेवटच्या शनिवारी सोनी या गावात मंडई भरत असते. दरम्यान, या मंडईच्या निमित्ताने गावात पाहुण्यांची रेलचेल असते. मात्र, पाहुणे म्हणूनच गेलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याने सोनी गावात शोककळा पसरली आहे.
मृतकांमधील इंदिराबाई दिवाकर हुळे या मुळच्या सरांडी/बुज येथील रहिवासी असून, त्या एका वर्षापासून मुलीकडे राहत होत्या. कडाक्याच्या थंडीमुळे त्यांची प्रकृती खालावली होती. गावात मंडईच्या निमित्ताने नाटकाचे आयोजन केले होते. त्यामुळे मृत इंदिराबाईंचे नातलग नाटक पाहण्यास गेले होते. घरी एकट्याच असलेल्या इंदिराबाईंचा थंडीने असह्य होऊन मृत्यू झाला. तिमा बकाराम मेहंदळे हे मंडईसाठी आपल्या सासरी सोनी येथे आले होते. पहाटेच्या सुमारास नाटक संपल्यानंतर काही युवक फिरायला जात असतांना गावालगतच्या पाण्याच्या टाकीजवळ तिमा मेहंदळे हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. युवकांनी तिमा मेहंदळे यांना गावातील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, आरोग्य सेविकेनी तिमा मेहंदळे यांना मृत असल्याचे सांगितले. तर सुमिञा जनार्धन दुपारे व ताराबाई प्रितमसिंह पवार या सोनी येथीलच रहिवासी होत्या. वृद्धापकाळामुळे त्या खाटेवरतीच पडून राहत होत्या. त्यांचा सुद्धा थंडीने असह्य होऊन मृत्यू झाला आहे.