पहिल्यांदाच इतवारी रिवा एक्सप्रेसला भंडारा रेल्वे स्थानकावर थांबा भंडारा: वर्षभरापासून रिवा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आलेले आहे. भंडारा रेल्वे स्थानकावर रीवा एक्सप्रेसला थांबा मिळाल्यामुळे गोंदिया, बालाघाट, जबलपूर, मैयर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता सुखकारक होणार आहे. पहिल्यांदाच रिवा एक्सप्रेसला थांबा मिळाल्यामुळे रविवारी खासदार सुनील मेंढे आणि नागरिकांनी या एक्सप्रेसचा जंगी स्वागत केले. रेल्वे चालकांचा शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वेच्या महाप्रबंधक सुद्धा उपस्थित होते. तर खासदार सुनील मंडे रेल्वेचे महाप्रबंधक यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
गाडीला थांबा मिळाळा:नागपूरच्या इतवारी रेल्वे स्टेशन पासून निघणारी ही गाडी भंडारा, तुमसर, तिरोडा या पैकी कोणत्याही स्टेशनवर न थांबता निघून जायची. त्यामुळे गोंदिया बालाघाट, जबलपूर मयूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना गोंदिया किंवा नागपूर गाठावा लागत होते. ही अडचण लक्षात घेता भंडारा जिल्ह्यातील प्रवाशांनी ही गाडी भंडारा रेल्वे स्थानकावर थांबावी अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने खासदारांना निवेदनही देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर खासदार सुनील मेंढे यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही मागणी मान्य करून घेतली. या रेल्वेला भंडारा रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात रेल्वे विभागाने पत्र काढून 2 एप्रिलपासून प्रत्यक्षात रेल्वेला थांबा देण्यात आला.
हिरवी झेंडा दाखवला: पहिल्यांदाच भंडारा रेल्वे स्थानकावर गाडी थांबणार असल्याने तिच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जमले होते. इतवारी येथून निघालेली ही गाडी रविवारी संध्याकाळी 7:20 वाजता भंडारा रोड रेल्वे स्थानकावर दाखल झाली. यावेळी स्वतः खासदार सुनील मेंढे, रेल्वेच्या महाप्रबंधक आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते. गाडी स्थानकावर आल्यानंतर खासदार सुनील मेंढे यांनी गाडी चालकाचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. हिरवा झेंडा दाखवीत पुढील प्रवासासाठी रवाना केले. ही गाडी रिवा ते इतवारी जाताना सकाळी 6:15 वाजता तर इतवारीकडून रिवाकडे जाताना सायंकाळी 7:20 वाजता भंडारा रोड रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. खासदार सुनील मेंढे यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे हा थांबा मिळाला. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळली जाणार आहे.
चार गाड्यांचा थांबा मिळावा: जवळपास पंधरा एक्सप्रेस गाड्यांच्या थांबांची मागणी प्रवाशांची आहे. मात्र यापैकी चार गाड्यांचा थांबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून यापैकी पहिली रिवा एक्सप्रेस या गाडीला थांबा मिळाला आहे. या गाडीच्या थांब्यामुळे गोंदिया, बालाघाट, जबलपूर, मैयर, रिवा या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना सोयीचे होईल. तसेच अजूनही बऱ्याच एक्सप्रेस गाड्यांच्या थांबा भंडारा रेल्वे स्थानकावर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून क्षमतेपेक्षा जास्ती गाड्यांचे आगमन आहे. तिसरी लाईन पूर्ण झाल्यानंतर हे अधिकचे थांबे मिळू शकतील असा विश्वास खासदार मेंढे यांनी यावेळी व्यक्त केला. येणाऱ्या काळात भंडारा, तुमसर, गोंदिया याठिकाणी रेल्वे स्टेशनचे आधुनिकरण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा: PM Modi Hyderabad Visit पंतप्रधानांच्या हस्ते तेलंगणात 11355 कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी वंदे भारतचेही होणार उद्घाटन