महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात कोरोनाचे ५ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने संसर्ग - भंडारा कोरोना बातमी

जिल्ह्यात सध्या आयसोलेशन वार्डमध्ये 29 लोकांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1553 स्वॅबचे नमुने पाठविले असून 1447 अहवाल प्राप्त झाले आहेत. 82 अहवाल अजून प्राप्त होणे बाकी आहेत.

Collector Office Bhandara
जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा

By

Published : May 29, 2020, 12:01 AM IST

भंडारा - कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने लाखांदूर तालुक्यातील 5 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढून 24 वर पोहोचली आहे. यापैकी 1 रुग्ण बरा झाला असून 23 लोकांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात 26 तारखेला 2 रुग्ण मिळाले होते. त्यापैकी एक रुग्ण हा लाखांदूर तालुक्यातील होता. हा रुग्ण ठाणेवरून कोणतीही परवानगी न घेता ट्रकमध्ये बसून मासळ गावापर्यंत आला तिथून दुचाकीने आपल्या गावी खैरी येथे गेला होता. एक दिवस घरीच थांबला होता. त्यानंतर त्याला क्वारंटाईन केले गेले होते आणि त्याच्या संबधित 12 लोकांच्या स्वॅबचे नमुने 27 तारखेला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या पैकी 7 अहवाल निगेटिव्ह आले असून 5 अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे कालची (बुधवारी) 19 रुग्ण संख्या वाढून गुरुवारी 24 झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्यांदाच एका व्यक्तीच्या चुकीची शिक्षा त्याच्या जवळच्या लोकांना मिळत आहे. हा व्यक्तीने ठाण्यावरून आल्यावर आपल्या घरी न जाता रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घेतली असती आणि स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले असते तर हे 5 लोक बाधित झाले नसते. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पहिले स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि स्वतःला 14 दिवस अलगिकरण कक्षात ठेवावे. तुमची एक चुकी तुमच्या जवळच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते, अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.

सध्या आयसोलेशन वार्डमध्ये 29 लोकांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1553 स्वॅबचे नमुने पाठविले असून 1447 अहवाल प्राप्त झाले आहेत. 82 अहवाल अजून प्राप्त होणे बाकी आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details