भंडारा- लॉकडाऊनच्या काळात इतर व्यवसायांप्रमाणे मस्त व्यवसायसुद्धा धोक्यात आला आहे. भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, इथेही मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन केले जाते. मात्र, लॉकडाऊन काळात बाजारपेठा आणि वाहतूक बंद असल्याने मागणी घटली आणि त्याचा फटका या मस्त उत्पादकांना बसला.
लॉकडाऊनमध्ये मच्छीमार ढिवर बांधव आले आर्थिक अडचणीत
भंडारा जिल्ह्यात हजाराच्यावर लहान-मोठे तलाव आहेत. तसेच गोसे धरण, बावनथडी धरण यासारख्या मोठ्या धरणांसह लहान धरणे आहेत. तसेच भंडारा जिल्ह्याची जीवनदायनी समजली जाणारी वैनगंगा नदी असून नदी पात्रातदेखील मासेमारी व्यवसाय येथील ढिवर बांधव करीत आहेत.
भंडारा जिल्ह्यात हजाराच्यावर लहान-मोठे तलाव आहेत. तसेच गोसे धरण, बावनथडी धरण यासारख्या मोठ्या धरणांसह लहान धरणे आहेत. तसेच भंडारा जिल्ह्याची जीवनदायनी समजली जाणारी वैनगंगा नदी असून नदी पात्रातदेखील मासेमारी व्यवसाय येथील ढिवर बांधव करीत आहेत. जिल्ह्यात मागूर, तेलापी, मरळ, परळ आणि सिंगाळा या सारख्या जातीच्या माशांचे उत्पादन घेतले जाते. या माशांना पंजाब, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
फेब्रुवारीपासून तलावातील किंवा नदीतील हा मासा ठोक विक्रेतांना विकला जातो. मात्र, मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला, त्यामुळे मागणीला अचानक ब्रेक लागला. त्यामुळे ठोक खरेदी करण्यासाठी विक्रेते आलेच नाहीत. त्यामुळे या मासेमाऱ्यांवर मोठी आर्थिक अडचण आली आहे. काही तलाव तर मे महिन्यात कोरडे पडतात, या अगोदर ही मासेमारी झाली नाही तर हे मासे तलावात मरतील आणि बाजारात देखील मासोळीला मागणी नसल्याने मासेमारी करायची तरी कशी? असा प्रशन मच्छिमार संस्था आणि स्थानिक ढिवर बांधवांना पडला आहे. शासनाने एक वर्षाची तलावांची लीज वाढवून द्यावी आणि या ढिवर बांधवांसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे.