भंडारा -पूर्वी अक्षता सोहळा पार पडल्यानंतर फोडले जाणारे फटाके आता जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणत फोडल्या जातात. त्यामुळे पूर्वीपेक्षा सध्याच्या घडीला फटाक्यांची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. फटाके प्रतीसाठी नाही तर देखाव्यासाठी फोडले जातात. फटाके मर्यादित प्रमाणात फोडावे, फटाक्यांमुळे ध्वनी प्रदुषण आणि वायु प्रदुषण मोठ्या प्रमाणात होतो, असे मत पुजारी यांनी मांडले आहे.
पूर्वीच्या काळात लग्नच्या वरातीवेळी किंवा स्वागत समारंभावेळी दोन-चार फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला जात होता. त्या काळात फटाक्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत नव्हते. त्यामुळे मर्यादित फटाक्यात लग्नाचा सोहळ्याचा उत्सव साजरा केला जात होता. आता मात्र जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी फटाके फोडले जातात. सध्या फटाके फोडण्याचे चलन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. एखाद्याच्या घरी बाळ जन्मला म्हणून फटाके फोडले जातात. तर कुठे घरातील एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतरही फटाके फोडत अंत्ययात्रा काढली जाते. एवढेच नाही तर कुठला राजकीय नेता आला तरी फटाके फोडून स्वागत केले जाते. राजकीय विजय किंवा भारतीय संघाने क्रिकेटचा समना जिंकलेला असो तरी फटाके फोडले जातात. एकंदरीतच काय तर प्रत्येक लहान-मोठ्या कारणासाठी फटाके फोडण्याची जणू एक नवीन प्रथाच सुरू झालेली आहे.