भंडारा- पवनी तालुक्यातील भुयार गावातील बाप-लेकाचा आज (रविवार) सायंकाळी झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.
दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, बाप-लेकाचा जागीच मृत्यू
पवनी तालुक्यातील भुयार गावातील बाप-लेकाचा आज (रविवार) सायंकाळी झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे.
आज भूयार येथील शालिक कारेमोरे (वय 55 वर्षे) व मुलगा विवेक (वय 25 वर्षे) दोघेही आपल्या दुचाकीने (क्र. एम एच 32 व्ही 0799) काँपा येथील राईस मिलवर तांदूळ आणण्यासाठी गेले होते. तांदूळ घेऊन परत येत असताना काँपा ते भूयार रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वडील आणि मुलाच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचाही जागेवर मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे आपल्या सहकाऱ्यांसह घटना स्थळावर धाव घेत दोघांचे मृतदेह शविच्छेदनासाठी पवनी येथील रुग्णालयात नेण्यात आले.