महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, शेतकऱ्यांचे आंदोलन - bhandara news

लाखांदूर तालुक्यातील शेतीची आणेवारी काढण्यासाठी 60 प्लॉट ठरवण्यात आले होते. या 60 पैकी 45 शेतकऱ्यांच्या शेतांवर तलाठी किंवा कृषी कर्मचारी पोहोचलेच नाहीत, असा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन

By

Published : Jan 2, 2021, 9:58 PM IST

भंडारा -यावर्षी पुर, किडरोग व परतीच्या पावसाने मोठी पिक हानी झाली. यामुळे उत्पादकतेत माठी घट झाली. हे लक्षात घेता अंतिम आनेवारित घट दाखवून लाखांदूर तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा, अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर लाखांदूरच्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय समोर निर्धार आंदोलन केले. दरम्यान, तहसीलदारांनी आंदोलनस्थळी भेट देत लाखांदूर तालुक्याची आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी दाखविली जाईल, असे आश्वासन दिले.

शेतकरी


कृषी अधिकारी, तलाठी, पटवारी हे शेतावर पोहोचलेच नाही-

लाखांदूर तालुक्यातील शेतीची आणेवारी काढण्यासाठी 60 प्लॉट ठरवण्यात आले होते. या 60 पैकी 45 शेतकऱ्यांच्या शेतांवर तलाठी किंवा कृषी कर्मचारी पोहोचलेच नाहीत, असा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. प्रत्यक्षात शेतावर येऊन पिकाची पाहणी न करता 50% टक्क्यांच्या वर आणेवारी दाखविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी लाखांदूर तहसील समोर आंदोलन केले होते.

50% याच्यावर आणेवारी दाखविली गेली-

शेतीत नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्याचे पैसे द्यावे लागतील. हे पैसे देण्याचे टाळण्यासाठी विमा कंपनीतर्फे तलाठी कृषी अधिकारी यासारख्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन 50% याच्यावर आणेवारी दाखविली गेली, असा आरोप आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी केला आहे. प्रत्यक्षात यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.

तुळतुळा अतिवृष्टी यामुळे मोठे नुकसान-

प्रत्यक्षात यावर्षी खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या दुष्टचक्र मुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाले आहे. सुरुवातीला पाऊस कमी पडला, नंतर अतिवृष्टी झाली. पूर आला, तुळतुळा सारख्या रोगाने ही शेतकऱ्यांची कंबरडे मोडले आहे. या सर्व कारणांमुळे उत्पादकतेत मोठी घट झाली आहे. मात्र असे असले तरी लाखांदूर तालुक्याची नजरअंदांज आणेवारी 50 टक्‍क्‍यांच्या वर दाखविणे हा शेतकऱ्यांवर केलेला अन्याय आहे. त्यामुळे या विरोधात आम्ही आंदोलन पुकारले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले.


तहसीलदारांनी मागण्या केल्या मंजूर-

निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे झालेल्या अतोनात नुकसानीच्या योग्य निरीक्षण करून जर आणेवारी काढली असती. तर तालुक्याची आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असती. लाखांदूर तालुक्यातील झालेल्या नुकसानाचा अंदाज पाहता तालुक्याची आनेवारी ही 50 टक्क्यांपेक्षा कमी असावी, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलकांशी तहसीलदारांनी चर्चा करून लाखांदूर तालुक्याची आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी दाखवू, असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात लाखांदूर तालुका हा दुष्काळग्रस्त घोषित होईल, असा विश्‍वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा-चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details