महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

25 वर्षांपूर्वी तलाव गिळंकृत करून बनवलं घरं...मात्र नकाशात अजूनही 'तलाव'च - samta nagar in bhandara

शहरातील लाला लाजपत राय वार्डात उभे राहिलेले समता नगर फेज-१ हे चक्क तलावात बनले आहे. पंचवीस वर्ष पहिले तलाव गिळंकृत करून याठिकाणी प्लॉट तयार करण्यात आले. त्यानंतर 95 टक्के परिसरात घरे बांधण्यात आली.

bhandara PWD department
25 वर्षांपूर्वी तलाव गिळंकृत करून बनवलं घरं...मात्र नकाशात अजूनही 'तलाव'च

By

Published : Jul 21, 2020, 6:22 PM IST

भंडारा - शहरातील लाला लाजपत राय वार्डात उभे राहिलेले समता नगर फेज-१ हे चक्क तलावात बनले आहे. पंचवीस वर्ष पहिले तलाव गिळंकृत करून याठिकाणी प्लॉट तयार करण्यात आले. त्यानंतर 95 टक्के परिसरात घरे बांधण्यात आली.

25 वर्षांपूर्वी तलाव गिळंकृत करून बनवलं घरं...मात्र नकाशात अजूनही 'तलाव'च

मात्र अद्याप नगर रचना विभागाच्या नकाशात हा तलाव शाबूत आहे. तलाव असल्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून विविध योजनांमार्फत विकासकामं करण्यात अडथळा येत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. नकाशातून तलावाची नोंद काढून याठिकाणी रहिवासी वस्तीची नोंद करावी, अशी मागणी त्यांनी केली. तर प्लॉटची विक्री ही नियमानुसार असल्याचे कंत्राटदारांनी सांगितले.

पंचवीस वर्षांपूर्वी बांधकाम कंत्राटदार प्रभात गुप्ता यांनी समता नगर फेज वन या नावाने तलावाच्या ठिकाणी प्लॉट पाडून त्यांची विक्री केली. नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात या प्लॉटची खरेदी केली होती. या ठिकाणी आता वसाहत बनली आहे. सिमेंटचे रस्ते आणि नाल्यांची निर्मिती झाली आहे. मात्र तरीही गार्डन आणि काही रस्त्यांची निर्मिती होणे अजूनही शिल्लक आहे. शासनाच्या विविध योजनेतून याची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू असताना नकाशात तलाव दिसत असल्याने बांधकामाचे प्रस्ताव फेटाळण्यात आले होते. एवढेच नाही तर कंत्राटदाराने ओपन स्पेसमधील जागेवरही प्लॉट पाडून त्याची विक्री केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. या परिसरात विकासकामं करायची आहेत. त्यामुळे नगररचना विभागाने त्यांच्या नकाशात असलेल्या तलावाची नोंदणी कमी करून त्याऐवजी वसाहत असल्याची नोंद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नगरसेवकांनी लावलेले आरोप हे चुकीचे आणि खोटे असल्याचे बांधकाम कंत्राटदार प्रभाग गुप्ता यांनी सांगितले. आम्ही प्लॉट पाडण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली असून त्यासंबंधी सर्व कागदपत्रे असल्याचे त्यांनी सांगितले. या अगोदरही अशा पद्धतीचे खोटे आरोप झाले. मात्र हे सर्व आरोप न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. जे रहिवासी या परिसरात राहतात त्यांना हा तलावाचा भाग आहे, याची पूर्णपणे जाणीव होती. मात्र प्लॉट खरेदी करताना आणि नंतर घरे बांधताना कोणत्याही शासकीय कागदपत्राच्या अडचणी आल्या नाहीत. एवढेच नाही तर घरबांधणीसाठी लागणारा कर्ज सुद्धा सहज उपलब्ध झाले. त्यामुळे आम्हाला कोणत्याही अडचणी नसल्याचे ते म्हणाले.

एखाद्या कृषक जागेला अकृषक करताना शासनाच्या जवळपास सहा विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यातीलच एक नगररचना विभाग असतो. रजिस्ट्रारनंतर नगररचना विभागाच्या नकाशात नवीन भागाची नोंद घेतली जाते. मात्र समतानगर फेस वन हा वीस वर्ष अगोदर बनवूनही अद्याप तलावाची नोंद कायम आहे. त्याचा नकाशा नगरविकास विभागाने बदललला नसल्याने या अडचणी निर्माण होत आहेत. याविषयी नगररचना विभागाला विचारल्यानंतर, लवकरच भंडारा तालुका, तुमसर तालुका आणि पवनी तालुक्यांमध्ये पुनर्रचना होणार असल्याने त्या वेळी बदल समोर येतील, असे स्पष्टिकरण देण्यात आले. मात्र, वरिष्ठ अधिकारी ऑफिसमध्ये नसल्याने त्यांनी कॅमेऱयासमोर बोलण्यास नकार दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details