भंडारा - शहर नगरपालिकेमध्ये सध्या सत्तेवर असलेल्या भाजपातर्फे उघडपणे भ्रष्टाचार केला जात असल्याचे बोलले जात होते. खाम तलाव चौक ते गांधी चौक या सुव्यवस्थित असलेल्या रस्त्यावर 50 लाखाचा पुन्हा रस्ता बनवला जात होता. मात्र, ईटीव्ही भारतने ही बातमी प्रसिद्ध करताच या कंत्राटदाराने रस्ते निर्मितीसाठी घातलेले साहित्य पुन्हा परत नेले. तसेच रहदारीसाठी मागच्या तीन दिवसांपासून बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू केला आहे.
ईटीव्ही भारतच्या बातमीनंतर भंडारा शहरात सुस्थितीत असलेल्या रस्त्यावरच रस्ता बनवण्याचे काम थांबवले ईटीव्ही भारतच्या बातमीनंतर रस्त्यावरच रस्ता बनवण्याचे काम थांबवून कंत्राटदाराने त्याचे साहित्य परत नेले आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार सध्या भंडारा शहराच्या दृष्टीने तापलेला हा विषय थंड करण्यासाठी हे काम बंद केले असून भविष्यात नळाची पाईपलाईन घालण्याच्या नावाखाली हा रस्ता फोडल्या जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा रस्त्यावर रस्ता बनवण्याची योजना आखली जात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, ईटीव्ही भारतच्या बातमीनंतर सध्यातरी रस्त्यावर रस्ता बनवण्याचे काम थांबल्यामुळे नागरिकांनी ईटीव्ही भारतचे विशेष आभार मानले आहे.
हेही वाचा -सरकारची तिजोरी खाली मग कंत्राटदारांना कामे कशी दिली जातात? प्रकाश आंबेडकरांचा सवाल
भंडारा शहरात अतिशय वाईट परिस्थितीत असलेले इतरही रस्ते असताना त्यांची निर्मिती न करता सुव्यवस्थित असलेल्या या रस्त्यावर रस्त्यांची निर्मिती का केली जात आहे? याविषयी त्या प्रभागातील नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना विचारना केली असता. त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.
ईटीव्ही भरातच्या बातमीनंतर जरी काम थांबवले गेले असले, तरीही हा प्रकार म्हणजे सध्या शहरात बातमीनंतर तापलेल्या वातावरणाला थंड करण्याचा प्रकार असल्याचा पुढे आला. रस्त्यावर रस्ते बनविण्याचे काम थांबल्यानंतर भाजपाच्या नेते मंडळीची नैतिकता कुठेतरी जागी झाली, असे बोलले जात आहे. मात्र, मुळात उघडपणे भ्रष्टाचार करणाऱ्या या लोकांनी आता भ्रष्टाचार करण्यासाठी नवीन योजना आखली आहे. यासाठी शहरात सुरू असलेल्या नळ योजनेसाठी पाईपलाईन घालण्यासाठी या रस्त्याला फोडले जाणार आहे आणि त्यानंतर रस्ता फुटला म्हणून त्यावर पुन्हा रस्त्यावर रस्ते बांधण्याचा प्रकार केले जाणार असल्याची योजना आखून या कंत्राटदाराने त्याचा साहित्य परत नेऊन नागरिकांना शांत करण्याचा एक डाव योजला असल्याचे बोलले जात आहे.