महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 15, 2021, 5:06 PM IST

ETV Bharat / state

'ऊर्जा खात्याच्या संबंधित काही त्रुटी होत्या का, हे तपासण्यासाठी आलो होतो'

नऊ जानेवारीला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पाहणी करण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. ऊर्जा खात्याचे मंत्री असल्याने या प्रकरणात ऊर्जा खात्यासंबंधी काही त्रुटी होत्या का, याची पाहणी करण्यासाठी आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भंडारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत न्यूज
भंडारा ऊर्जा मंत्री नितीन राऊत न्यूज

भंडारा - नऊ जानेवारीला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पाहणी करण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. ऊर्जा खात्याचे मंत्री असल्याने या प्रकरणात ऊर्जा खात्यासंबंधी काही त्रुटी होत्या का, याची पाहणी करण्यासाठी आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

'ऊर्जा खात्याच्या संबंधित काही त्रुटी होत्या का, हे तपासण्यासाठी आलो होतो'
अधिकचे वॉर्मर का लावले गेले हे बघितले पाहिजे

शुक्रवारी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून त्याविषयी त्यांनी सविस्तर जाणून घेतले. 'एसएससीयू युनिटमध्ये इन्क्युबेटरला वॉर्मर असतानाही वेगळे वॉर्मर लावण्याची गरज का होती, याचा तपास घेतला जात आहे. मी ऊर्जा खात्याचा मंत्री असल्याने या घटनेमध्ये माझ्या खात्याशी संबंधित काही उणिवा होत्या का, याची तपासणी करण्यासाठी मी आज आलो,' मात्र, माझ्या खात्याची इथे काहीही चूक दिसत नाही. 11 केव्हीची लाईन इथे आमच्या विभागातर्फे दिली जाते. ती लाईन ट्रिप झाली आहे. त्यामुळे माझ्या खात्याची चूक दिसत नाही. ही लाईन का ट्रिप झाली, हे पीडब्ल्यूडीचे अधिकारी सांगू शकतील. सध्या चौकशी सुरू असल्याने त्यांना विचारणे योग्य नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा -तुर्तास दिलासा! धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत निर्णय

मात्र, अहवाल केव्हा येईल, याविषयी निश्चित सांगितले नाही

ही घटना केव्हा घडली, कशी घडली, कोणाच्या चुकीमुळे घडली, मानवी चूक होती की, हा एक अपघात होता, याविषयी सुरू असलेली चौकशी कधी पूर्ण होईल आणि कधी त्याचा अहवाल पुढे येईल, असे विचारले असता नितीन राऊत स्पष्टपणे उत्तर देऊ शकले नाहीत. अहवाल लवकरच येईल. घटना अतिशय निंदनीय आहे आणि योग्य तपासणीनंतर शक्य तेवढ्या लवकर हा अहवाल सादर करू, असे यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले.

डझनभर मंत्री आले; मात्र, हाती काहीच लागले नाही

घटना घडून आज आठ दिवस झालेले आहेत. शुक्रवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. आज दुसरा शुक्रवार आला. मात्र, या घटनेत ठोस असे काहीही पुढे आले नाही. घटनेनंतर जवळपास डझनभर मंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली. रुग्णालयाची पाहणी केली. मात्र, ज्या अहवालाची प्रतीक्षा सर्वांना आहे, तो अजूनपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांना या मंत्र्यांपासून काही अपेक्षा उरलेली नाही.

हेही वाचा -मुंडे-मलिकांच्या राजीनाम्या बाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details