भंडारा -जिल्ह्यात आज 3 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक ( Election of Mayor ) झाली असून दोन ठिकाणी भाजपा तर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. 19 जानेवारीला झालेल्या या तीनही नगरपंचायतीच्या निकालात मोहाडी आणि लाखांदूर तालुक्यात भाजपाने ( BJP in Mohadi and Lakhandur talukas ) 17 पैकी 9 जागा मिळवून बहुमत मिळविला होता.
- मोहाडी नगरपंचायत ठरली वादग्रस्त
दोन टप्प्यात पार पडलेल्या नगरपंचायतचा निकाल 19 जानेवारीला लागला. यामध्ये मोहाडी नगरपंचायतीमध्ये 17 पैकी 9 जागा जिंकून भाजपाने बहुमत मिळविला. त्यामुळे मोहाडी नगरपंचायतमध्ये भाजपाची सत्ता स्थापन होईल, हे निश्चित झाले होते. मात्र असे असले तरी 16 फेब्रुवारीपर्यंत पंचायतीवर नेमकी सत्ता कोणाची बसणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून होते. कारण भाजपामधील दोन गटातील अंतर्गत वादामुळे हाती आलेली सत्ता एक गट दुसऱ्या पक्षाची मदत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशी चर्चा सतत सुरू होती. मात्र 16 फेब्रुवारीला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोन्ही गटाला एकत्रित बोलून त्यांच्यात समिट घालून आणला. त्यामुळे 17 फेब्रुवारीला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे बहुमत सिद्ध करत भाजपाच्या छाया डेकाटे यांची नगराध्यक्षपदी तर नगर उपाध्यक्षपदी शैलेश गभने यांची निवड झाली आहे.
- लाखांदूरमध्ये भाजपाचे बहुमत असूनही उपाध्यक्ष अपक्ष