भंडारा -नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला आज भेट दिली. विषय अतिशय गंभीर असल्याने चौकशी निष्पक्ष होईल आणि लवकरच चौकशी अहवाल मिळेल, असे त्यांनी या वेळी सांगितले.
'अहवाल लवकरच'
शिवसेनेतर्फे 1 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी अहवाल लवकरच मिळेल. शुक्रवारी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये बालकांच्या जळीत हत्याकांडाचा अहवाल अजूनही आलेला नाही. मात्र दररोज कोणीतरी नवीन मंत्री रुग्णालयाला भेट देण्यासाठी येत आहे. बुधवारी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांनीसुद्धा आतापर्यंत आलेल्या इतर मंत्राप्रमाणे पाहणीचे काम केले. सुरुवातीला घटनास्थळी जाऊन चौकशी, पाहणी केली. नंतर जे बालक या घटनेत सुखरूप बचावले त्यांना भेट दिली. यावेळेस माध्यमांशी बोलताना त्यांना वारंवार एकच प्रश्न विचारला गेला आणि त्या प्रश्नाचे त्यांनी एकच उत्तर दिले, ते म्हणजे चौकशीचा अहवाल लवकरच पुढे येईल.