भंडारा - लॉकडाऊनच्या काळात दहा विविध प्रजातींच्या सापांना सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे. पोलीस मुख्यालयाच्या आवारात निघालेल्या दोन सापांमध्ये अतिशय विषारी घोणस जातीच्या सापांचा समावेश होता. सर्पमित्र व आर आर यु टीमला या सापांना पकडण्यात यश आले आहे. या सर्व सापांना वन अधिकारी यांच्या देखरेखीखाली जंगलात सोडण्यात आले आहे.
भंडारा : लॉकडाऊन काळात 10 विविध प्रजातींच्या सापांना सर्पमित्रांनी दिले जीवनदान.. - विषारी सापांना जीवनदान
लॉकडाऊनच्या काळात दहा विविध प्रजातींच्या सापांना सर्पमित्रांनी जीवदान दिले आहे. पोलीस मुख्यालयाच्या आवारात निघालेल्या दोन सापांमध्ये अतिशय विषारी घोणस जातीच्या सापांचा समावेश होता.
![भंडारा : लॉकडाऊन काळात 10 विविध प्रजातींच्या सापांना सर्पमित्रांनी दिले जीवनदान.. Snake friends gave life to 10 different species of snakes in bhandara](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7270520-758-7270520-1589951760762.jpg)
दोन दिवसानंतर पुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या निवासस्थानी घोणस या जातीचा अतिशय विषारी साप आढळल्याने तत्काळ वन विभागाच्या जलद बचाव दलातील (RRU TEAM) अनिल शेळके व सर्पमित्र प्रवीण कारेमोरे, अनुराग गायधने हे तत्काळ तिथे पोहोचले व त्यांनी त्या सापाला पकडुन सुरक्षित जागी सोडल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.
लॉकडाउनच्या दरम्यान दहा विविध प्रजातीच्या सापांना पकडून जीवदान दिले आहेत. विशेष म्हणजे सद्या कोरोना विषाणूचा थैमान सुरू असल्यावरही आर आर यु टीमचे अनिल शेळके व सर्प मित्र परिवाराचे प्रविण कारेमोरे, अनुराग गायधने, राजु बडवाईक, फागन नेवारे, विरू बोंडे हे आपले जीव धोक्यात घालुन साप वाचविण्याची धडपड करीत.