भंडारा :भंडारा जिल्ह्याच्या ( Bhandara District ) तुमसर तालुक्यातील ( Tumsar Taluka ) धनेगाव जंगल परिसरात रात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने धनेगाव जलमय ( Dhanegaon Flooded Due to Bursting of a Lake ) झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊस दमदार आल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला. त्यामुळे लोकांना पाण्याच्या अंदाज आला नाही आणि जवळपास 15 घरांत पाणी ( 15 Houses are Under Water ) शिरले.
पहाटे 3 वाजता फुटले तलाव :भंडारा जिल्ह्यात दिवसभर पूर्णपणे शांत असलेल्या पावसाने रात्री बारानंतर सुरुवात केली. वादळवाऱ्यासह विजेच्या गडगडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विशेषतः तुमसर तहसीलमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. तुमसर तालुक्यातील जंगल परिसरात ढगफुटीसदृश पाऊस बरसल्याने चुलहरडोह येथील जंगलातील तलाव फुटल्याने धनेगावात पाणी शिरले. संपूर्ण गावातून जणू नदी वाहू लागली होती. पहाटे तीन वाजेला गावात पाणी शिरल्याने आणि विद्युत पुरवठा बंद असल्याने लोकांना नेमका अंदाज आला नाही. मात्र, पहाट उजळल्यावर परिस्थितीचा अंदाज गावकऱ्यांना आला.