महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जय भीमच्या नाऱ्याने दुमदुमली भंडारानगरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी - bhandara

सकाळी निघालेली रॅली संपूर्ण भंडारा शहरात फिरली तर सायंकाळी शास्त्री चौकातून शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेत सर्वच समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभाग घेतला

जय भीमच्या नाऱ्याने दुमदुमली भंडारानगरी

By

Published : Apr 15, 2019, 7:50 AM IST

भंडारा- डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती रविवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकाळी बाईक रॅली तर सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर जय भीमच्या नाऱ्याने आणि निळ्या रंगात न्हाऊन निघाला.

महामानव, संविधान निर्माते, दलितांचे कैवारी आणि ज्यांनी माणसांना माणूसपण दिले अशा बाबासाहेबांच्या जयंती निमित्त संपूर्ण भंडारा जिल्ह्यात दलित बांधवांनी रॅली आणि शोभायात्रा काढल्या. एकच साहेब बाबासाहेब, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब तेरा नाम रहेगा या नाऱ्यांची गुंज सर्वत्र ऐकू येत होती.

जय भीमच्या नाऱ्याने दुमदुमली भंडारानगरी

सकाळी निघालेली रॅली संपूर्ण भंडारा शहरात फिरली तर सायंकाळी शास्त्री चौकातून शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेत सर्वच समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभाग घेतला. शोभायात्रा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. शोभायात्रेत डॉ. बाबसाहेबांची आकर्षक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शोभायात्रा शास्त्री चौकातून निघून गांधी चौक, मुख्य बाजारपेठ, पोस्ट ऑफिस चौक येथून जात त्रिमूर्ती चौकात संपली.

ABOUT THE AUTHOR

...view details