भंडारा - अखेर आठव्या दिवशी गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघडले गेले असून 12 दरवाजे अर्ध्या मीटरने तर 21 दरवाजे 1 मीटरने उघडले गेले आहे. संपूर्ण 33 दारातून 5955.85 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला येल्लो अलर्ट दिला असून मागील 24 तासांमध्ये सात पैकी पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. नदी नाले दुथडी वरून वाहत असून तुमसर तालुक्यामध्ये सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला असून लोकांच्या घरात सुद्धा पाणी गेलेला आहे.
गोसे धरणाचे 33 ही दार उघडले गेले, जिल्ह्यात 5 तालुक्यात अतिवृष्टी या मोसमात पहिल्यांदाच उघडले गेले 33 ही गेट -मागील 24 तासात संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने तसेच गोसीखुर्द पानलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरु असल्यामुळे धरणात पाण्याची आवक सतत होत होती त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित आणण्यासाठी गोसीखुर्द धरणाच्या प्रशासनाने संपूर्ण 33 दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दर तासाला धरणात येणाऱ्या पावसाचा प्रवाह लक्षात घेऊन दार उघडण्याचे प्रमाण कमी ज्यास्त केले जात आहे. 12 वाजे ला गोसे धरणाचे 12 दार हे अर्ध्या मीटर ने उघडले होते तर 21 दार हे 1 मीटर ने उघडण्यात आले होते. यामधून 5955.85 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असल्याने मासेमार बांधवाना नदी पात्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय नदी काठावरील गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
24 तासात 5 तालुक्यात अतिवृष्टी - हवामान खात्याने भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट मागील 24 तासांमध्ये भंडारा जिल्ह्याच्या सात पैकी पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. सर्वाधिक पाऊस हा तुमसर तालुक्यात 148 मिमी, लाखांदूर 135, साकोली 115, पवनी 106, मोहाडी 90.4, लाखनी 59.4, भंडारा 16.4 मिमी पासून पडला असून आता पर्यंत 112 टक्के पासून पडला आहे.
तुमसरमध्ये सखल भागाच्या घरात पाणी -अतिवृष्टीमुळे तुमसर शहराच्या सखल भागातील घरामध्ये पाणी गेल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तसेच तुमसर तालुक्यातील गोदेखोरी गावातील नाल्याला पूर आल्याने 25 घरात पाणी शिरले आहे. या पूर आलेल्या नाल्यावर जीव धोक्यात घालून नागरिक पूल ओलांडत आहेत. जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यातील लहान मोठे नदी-नाले ओसंडून वाहत असून काही नाल्याच्या पुलावर पाणी वाहत असल्याने नागरिकांनी या दरम्यान पुलावरून रहदारी करू नका असे आव्हान जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केली आहे.