महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bahirangeshwar temple : बहिरंगेश्वर मंदिरात देव दिवाळीचा सोहळा, मंदिराला फुलांची, आकर्षक विद्युत रोषणाईची सजावट - बहिरंगेश्वरात मंदिरात देव दिवाळी साजरी

भंडाऱ्याचे ग्रामदैवत असलेल्या बहिरंगेश्वरात मंदिरात देव दिवाळीचा सोहळा पार ( Dev Diwali celebration Bahirangeshwar temple ) पडला. देवांची ही दिवाळी साजरी करताना त्यांचे भक्त परमेश्वरा चरणी लीन झाल्याचे दिसत होते.

Bahirangeshwar Temple
बहिरंगेश्वर मंदिर

By

Published : Nov 26, 2022, 1:21 PM IST

भंडारा :शेकडो दिव्यांनी उजळला बहिरंगेश्वर मंदिराचा ( Bahirangeshwar Temple Bhandara) परिसर. फुलांची आकर्षक अशी करण्यात आलेली आरास आणि थंडी असतानाही भक्तांची दर्शनासाठी झालेली गर्दी अशा उत्साह पूर्ण वातावरणात भंडाऱ्याचे ग्रामदैवत असलेल्या बहिरंगेश्वरात मंदिरात देव दिवाळीचा सोहळा पार ( Dev Diwali celebration Bahirangeshwar temple ) पडला. देवांची ही दिवाळी साजरी करताना त्यांचे भक्त परमेश्वरा चरणी लीन झाल्याचे दिसत होते.

बहिरंगेश्वर मंदिर

कार्तिक शुक्ल एकादशी :कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस देव दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या दिवशी बळीच्या राज्यातून भगवान श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले होते असे समजले जाते. याचा आनंद म्हणून हा देव दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि संध्याकाळी दीपदान करणे पवित्र मानले जाते. देव दिवाळीचे औचित्य साधून सर्व मंदिरांवर दिव्यांची आरास आणि विद्युत रोषणाई करून सजावट केली जाते. ग्रामदैवत असलेल्या बहिरंगेश्वर मंदिरातही देव दिवाळीचा सोहळा तेवढ्यात उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

मंदिरावर विद्युत रोषणाई : मंदिरावर विद्युत रोषणाई करून संपूर्ण मंदिर फुलांनी आकर्षकरीत्या सजविण्यात आले ( lighting in Bahirangeshwar temple ) होते. फुलांनी सजवलेला परमेश्वराचा गाभारा येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. सोबतच मंदिर परिसरात पणत्या लावून आकर्षक अशी आरास करण्यात आली होती. शेकडो पण त्यांनी मंदिराचा परिसर उजळून गेला होता.यावेळी असर फाउंडेशनच्या कलावंतांनी सादर केलेले शिवतांडव नृत्य, विनोद पथे यांचे मृदंग वादन, ढोल ताशा पथकाचे आकर्षक असे वादन याचे सादरीकरण करण्यात आले. देव दिवाळीचे औचित्य साधून भगवान बहिरंगेश्वराला महा अभिषेक करण्यात आला. डॉ. नरेंद्र व अश्विनी व्यवहारे यांनी घेतले होते.

फटाक्यांची आतिषबाजी :भगवंताच्या अभिषेकानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी दोन हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ ( Mahaprasad Facilitation for devotees ) घेतला. आ. नरेंद्र. भोंडेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनीही सोहळ्यात उपस्थिती दर्शविली. बहिरंगेश्वर मंदिरास राम मंदिर आणि लक्ष्मी नारायण मंदिर या ठिकाणीही देव दिवाळी साजरी करण्यात आली. देव दिवाळीचा सोहळा आलेल्या भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता. देवस्थान समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details