महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊनमध्ये ब्रॉडबँडला सुगीचे दिवस - broadband connection bhandara news

लॉकडाऊन सुरू झाले आणि या बंद झालेल्या ब्रॉडबँड सेवेला पुन्हा मागणी आली. बीएसएनएलसह खासगी कंपन्याही आता ब्रॉडबँड सेवा देत आहेत. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी दिवसाकाठी एक किंवा दोन लोक ब्रॉडबँडसाठी येत होते. मात्र, ही मागणी अचानक एवढी वाढली की, एका दिवशी सात ते आठ नवीन ग्राहक जुळत आहेत. अचानक मागणी वाढल्याने सेवा देणार्‍या लोकांचीही तारांबळ उडाली आहे.

लॉकडाऊनमध्ये ब्रॉडबँडला सुगीचे दिवस
लॉकडाऊनमध्ये ब्रॉडबँडला सुगीचे दिवस

By

Published : Sep 8, 2020, 7:07 PM IST

भंडारा : लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये बरेच व्यवसाय तोट्यात गेले तर, काही व्यवसायांना अधिक चांगले दिवस आले. तर, ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या व्यवसायिकांना या लॉकडाऊनचा सर्वाधिक फायदा झाला. एरवी जेवढी मागणी वर्षभरात येत नव्हती, त्यापेक्षा जास्त मागणी या चार महिन्यांच्या कालावधीत आली असल्याचे ब्रॉडबँड सेवा देणार्‍यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये ब्रॉडबँडला सुगीचे दिवस

खासगी आणि शासकीय दोन्ही कंपन्यांना या लॉकडाऊनचा फायदा झाला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय, खासगी कार्यालय, आयटी कंपन्या सर्व बंद झाल्या. त्यामुळे वर्क फॉर्म होम, ऑनलाइन अभ्यास, व्हिडीओ कॉन्फरन्स या गोष्टींना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. जिल्ह्याबाहेर नौकारीवर असलेले बरेच नागरिक जिल्ह्यात परत आले. त्यांचा वर्क फ्रॉम होम सुरू झाले. मात्र, अचानक इंटरनेटची मागणी वाढल्यामुळे मोबाईलला हवी तस ास्पीड मिळत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण असेल किंवा वर्क फ्रॉम होम हे शक्य होत नव्हते.

सुरुवातीला केवळ शासकीय बीएसएनएल कंपनी ब्रॉडबँड सेवा पुरवायची. मात्र, मोबाईलचा डेटा स्वस्त झाल्यानंतर ब्रॉडबँडची मागणी कमी होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे बऱ्याच लोकांनी त्यांचा ब्रॉडबँड सेवा बंद केली होती. मात्र, लॉकडाऊन सुरू झाले आणि या बंद झालेल्या ब्रॉडबँड सेवेला पुन्हा मागणी आली. बीएसएनएलसह खासगी कंपन्याही आता ब्रॉडबँड सेवा देत आहेत. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी दिवसाकाठी एक किंवा दोन लोक ब्रॉडबँडसाठी येत होते. मात्र, ही मागणी अचानक एवढी वाढली की, एका दिवशी सात ते आठ नवीन ग्राहक जुळत आहेत. अचानक मागणी वाढल्याने सेवा देणार्‍या लोकांचीही तारांबळ उडाली आहे.

भंडारा शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत जवळपास हजार नवीन कनेक्शन लावले गेले. एवढे कनेक्शन आधी वर्षभरात सुद्धा लावले जात नसत. भंडारा जिल्ह्याच्या सातही तालुक्यांचा विचार केला तर जवळपास अडीच-तीन हजार नवीन कनेक्शन या लॉकडाऊन काळात लावले गेले. यामध्ये बीएसएनएल आणि खासगी कंपन्याचे कनेक्शन आहेत.

हेही वाचा -कोष्टी समाजाचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात; विणकरांना शासनाच्या मदतीची अपेक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details