दिलासादायक! जिल्ह्यतील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण मंदावले, तीन दिवसात केवळ 5 नवीन बाधित
शनिवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण हा तुमसर तालुक्यातील 53 वर्षीय व्यक्ती असून सध्या तो नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर एक रुग्ण बरा होऊन घरी गेला असून आता 87 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 207 घश्याचे नमुन्यांचा अहवाल प्रतिक्षित आहे.
भंडारा - जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण मागील तीन दिवसात कमी झाला आहे. मागील तीन दिवसांमध्ये केवळ 5 रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी सुद्धा एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर एक रुग्ण बरा होऊन घरी गेला. बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 100 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 189 असून 87 क्रियाशील रुग्ण आहेत. तर दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेला रुग्ण हा तुमसर तालुक्यातील 53 वर्षीय व्यक्ती असून सध्या तो नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर एक रुग्ण बरा होऊन घरी गेला असून आता 87 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 207 घश्याचे नमुन्यांचा अहवाल प्रतिक्षित आहे.
7 जुलै नंतर भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढली. त्या काळात एका दिवशी 49 रुग्ण सुद्धा आढळले. केवळ आठ दिवसात नवीन शंभर रुग्ण जिल्ह्यात आढळून आले होते. त्यामुळे येत्या 18 जुलैपर्यंत जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही सहज 200 च्या वर जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मागील तीन दिवसांपासून रुग्ण वाढण्याचे प्रमाण अचानक कमी झाले 16 तारखेला दोन रुग्ण 17 तारखेला दोन आणि 18 तारखेला एकच रुग्ण जिल्ह्यात आढळून आला आहे. त्यामुळे सध्यातरी भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक थांबविण्यात काही प्रमाणात का होईना नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आल्याचे दिसत आहे. त्यातच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 100 वर पोहोचल्याने जिल्हावासियांसाठी ही समाधानाची गोष्ट आहे. सध्या भंडारा शहरातील मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम मोठ्या प्रमाणात रावबिली जात आहे. नागरिकांनीही कोरोनाच्या नियमाचे पालन काटेकोरपणे केल्यास जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर मिळविलेला नियंत्रण दीर्घकाळ ठेवून जिल्हा कोरणा मुक्त करता येऊ शकेल.