महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साकोलीतील 'त्या' अल्पवयीन मुलीने प्रेमात नैराश्यापोटी आत्महत्या केल्याचा अंदाज; पोलीस तपास सुरू - अल्पवयीन मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह bhandara

साकोली येथील एका शाळेत शिकणारी 15 वर्षीय मुलगी 14 डिसेंबरला नेहमी प्रमाणे घरातून शाळेत जात असल्याचे सांगून सायकल घेऊन निघाली. मात्र, मृत मुलगी हि शाळेत न जाता आपल्या मैत्रिणीकडे गेली आणि तेथून शाळेचा ड्रेस बदलून साकोली शहरात गेली. शाळा सुटली तरी मुलगी घरी परत न आल्याने कुटूंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. संध्याकाळ होऊनही मुलगी घरी  न परतल्याने शेवटी कुटूंबियांनी साकोली पोलीस स्टेशनमध्ये तिची बेपत्ता असल्याची तक्रार केली.

bhandara
साकोलीतील 'त्या' अल्पवयीन मुलीने प्रेमात नैराश्यापोटी आत्महत्या केल्याचा अंदाज; पोलीस तपास सुरू

By

Published : Jan 26, 2020, 1:20 AM IST

भंडारा - साकोली तालुक्यात तब्बल 40 दिवसांनंतर एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमात आलेल्या नैराश्यापोटी या मुलीने स्वतः विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परंतू, संपूर्ण तपास झाल्यानंतर ही हत्या की आत्महत्या होती याचा खुलासा होईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. मुलीच्या पालकांनी मात्र मुलीची हत्या करून या ठिकाणी मृतदेह आणून टाकल्याचा आरोप केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनीही तपासात दिरंगाई केल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटूंबाने केला आहे.

साकोलीतील 'त्या' अल्पवयीन मुलीने प्रेमात नैराश्यापोटी आत्महत्या केल्याचा अंदाज; पोलीस तपास सुरू

हेही वाचा -काळ आला होता पण वेळ आली नव्हती, तुमसर तालुक्यात वाघाची दहशत

साकोली येथील एका शाळेत शिकणारी 15 वर्षीय मुलगी 14 डिसेंबरला नेहमी प्रमाणे घरातून शाळेत जात असल्याचे सांगून सायकल घेऊन निघाली. मात्र, मृत मुलगी हि शाळेत न जाता आपल्या मैत्रिणीकडे गेली आणि तेथून शाळेचा ड्रेस बदलून साकोली शहरात गेली. शाळा सुटली तरी मुलगी घरी परत न आल्याने कुटूंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. संध्याकाळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने शेवटी कुटूंबियांनी साकोली पोलीस स्टेशनमध्ये तिची बेपत्ता असल्याची तक्रार केली.

हेही वाचा -VIDEO: वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांवर वाघाचा हल्ला

घटेनच्या 4 दिवसानंतर मृत मुलीची सायकल वन विभागाच्या नर्सरी जवळ मिळाली. मात्र, मुलीचा थांगपत्ता लागला नाही. शेवटी चाळीस दिवसानंतर त्याच नर्सरीमध्ये मुलीचा झाडाला टेकून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळाला. सुरुवातीला हा मृतदेह आपल्या मुलीचा नसल्याचा दावा करणाऱ्या कुटूंबियांनी मृतदेहाजवळ मिळालेल्या शालेय पुस्तके, ड्रेस, घड्याळ या वस्तूंवरून मृतदेहाची ओळख पटवली. ज्या ठिकाणी सायकल मिळाली त्याच परिसरात तब्बल 40 दिवसानंतर मुलीचा मृतदेह मिळाल्याने मृत मुलीच्या कुटूंबियांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हेही वाचा -भंडाऱ्यात 40 दिवसांपूर्वी हरवलेल्या शाळकरी मुलीचा मृतदेह सापडला; पोलीस तपास सुरू

या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने केला असता तर मुलीचा मृत्यू झाला नसता असे तिच्या कुटूंबियांनी म्हटले आहे. मुलीची हत्या करून मृतदेह त्या ठिकाणी आणून ठेवल्याचा आरोप पालकांनी केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या प्राथमिक तपासात या मुलीचे गावातीलच एका मुलाबरोबर प्रेम संबंध होते. मात्र दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने मुलाने मुली पासून दूर राहायला सुरुवात केली. त्यामुळेच प्रेमातील नैराश्यापोटी या मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतू असे असले तरी पोलिसांनी यावर बोलण्याचे टाळले आहे. मात्र, या मुलीने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली की, कोणी तिची हत्या केली, याचा तपास पोलीस करीत असून पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जी केली का याचा ही तपास पोलीस उपाधिक्षकांमार्फत केला जात आहे. याप्रकरणाचा लवकरच छडा लागेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक यांनी दर्शविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details