महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोहाडीमध्ये माय-लेकाला ट्रक्टरने चिरडले; आईचा मृत्यू, मुलगा जखमी - भंडाऱ्यामध्ये अपघात

अरविंद भुते हा आपल्या आईला बँकेत पैसे काढण्यासाठी दुचाकीवरून मोहाडी येथे घेऊन जात होता. त्यावेळी कुशारी फाट्यावर मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये ताराबाईंचा मृत्यू झाला.

मोहाडीमध्ये ट्रक्टरच्या धडकेत आईचा मृत्यू

By

Published : Sep 23, 2019, 9:28 PM IST

भंडारा- मोहाडी तालुक्यातील कुशारी फाट्यावर ट्रक्टरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ताराबाई ब्रम्हणद भुते (वय 50) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

मोहाडीमध्ये ट्रक्टरच्या धडकेत आईचा मृत्यू

हेही वाचा - मासेमारी करताना तलावात बुडून युवकाचा मृत्यू

अरविंद भुते (वय 23) हा आपल्या आईला बँकेत पैसे काढण्यासाठी दुचाकीवरून मोहाडी येथे घेऊन जात होता. त्यावेळी कुशारी फाट्यावर मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये ताराबाईंचा मृत्यू झाला. तर अरविंद भुते जखमी झाला. जखमी अरविंदला उपचारासाठी मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातानंतर ट्रक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. चालका विरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -विधानसभा निवडणुकीसाठी भंडारा जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज

या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नुकसान भरपाई दिल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, अशी नागरिकांनी भूमिका घेतली होती. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांच्या मध्यस्तीने मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details