भंडारा- पवनी तालुक्यातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. महिलेचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या कमरेला दोराने दगड बांधून वैनगंगा नदी पात्रात मृतदेह फेकल्याची घटना कुरळी येथे उघडकीस आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
वैनगंगा नदीत आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह, हत्येनंतर मृतदेह फेकल्याचा प्राथमिक अंदाज
पवनी तालुक्यातील एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
तीन दिवसांपूर्वीच भंडारा शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. त्या मृतदेहाची ओळख अजूनही पटली नव्हती त्यातच पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील वैनगंगा नदीच्या घाटावर एका अनोळखी महिलेचे प्रेत आले. 30 ते 35 वयोगटातील या महिलेच्या उजव्या हातावर हृदयाचे चिन्ह काढले असून यामध्ये इंग्रजी अक्षरातील एस हा शब्द गोंदलेला आहे. तिच्या तोंडाला स्कार्फ बांधला होता आणि तिच्या पोटाला दोरीने एक मोठा काळा दगड बांधण्यात आला होता. या महिलेचा गळा आवळून खून करून तिचे प्रेत वर येऊ नये, यासाठी मोठा दगड बांधला गेला असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न आणि आरोपींचा शोध पोलीस करत आहेत. केवळ तीन दिवसांच्या अंतरात दोन अज्ञात मृतदेह सापडल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधून काढण्याचा मोठे आव्हान पुढे येऊन ठेपले आहे.
हेही वाचा - भंडारा वाहतूक शाखेत अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहने दाखल