भंडारा - तालुक्यातील सालेबर्डी या गावामध्ये पती-पत्नीची त्यांच्याच घरासमोर लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. जुन्या वैमन्यसातून शेजाऱ्यानेच हत्या केली असून, हत्येनंतर त्यांनी पोलिसांना समोर आत्मसमर्पण केले आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे मृत दाम्पत्याच्या 5 वर्ष्याच्या मुलीसमोरच त्यांची हत्या करण्यात आली. विनोद बागडे(३९) आणि प्रियांका बागडे(३१) अशी दोघा मृतांची नावे आहेत. तर मंगेश गजभिये असे आरोपीचे नाव आहे. एका महिन्यात भंडारा तालुक्यातील हत्येची ही तिसरी घटना आहे. या हत्येनंतर भंडारा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कारधा पोलीस स्टेशनच्या हदीतील आणि भंडारा शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या सालेबर्डी या गावातील रहिवासी विनोद बागडे हा त्याच्या राहत्या घरी अवैध दारू विक्री करीत होता. तर आरोपी हा त्याच्या शेजारीच राहायला असून या दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे. या दोघांनीही यापूर्वी परस्परविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
मंगळवारी(14) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बागडे यांचा पाळीव कुत्रा हा आरोपीच्या घरी गेला असता, आरोपीने त्याला काठीने मारले. ते समजतात प्रियंका बागडे आणि विनोद बागडे यांचे आरोपीसोबत जोरदार भांडण झाले. त्यावेळी बागडे दाम्पत्याने आरोपीला मारहाण केली. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने लोखंडी रॉड आणून पहिले विनोद बागडे यांच्या डोक्यावर वार केला, त्यावेळी विनोदला वाचवायला आलेल्या त्याच्या पत्नीवरदेखील आरोपीने लोखंडी रॉडने जोराचा प्रहार केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
कुत्रा ठरला निमित्त... भंडाऱ्यात पती-पत्नीची लोखंडी रॉडने हत्या - bhandara crime news
कारधा पोलीस स्टेशनच्या हदीतील आणि भंडारा शहरापासून 5 किमी अंतरावर असलेल्या सालेबर्डी या गावातील रहिवासी विनोद बागडे हा त्याच्या राहत्या घरी अवैध दारू विक्री करीत होता. तर आरोपी हा त्याच्या शेजारीच राहायला असून या दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे, या दोघांनीही यापूर्वी परस्परविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
घटनेच्या वेळी बागडे दाम्पत्याची पाच वर्षाची मुलगी ही तिथेच उभी होती, तिने हा हाणामारीचा संपूर्ण प्रकार बघितला आहे. विशेष म्हणजे मृतकांनी या मुलीला दत्तक घेतले होते. या दोघांच्या हत्येनंतर ही मुलगी पुन्हा अनाथ झाली आहे.
हत्येनंतर आरोपी मंगेशने कारधा पोलीस स्टेशन येथे आत्मसमर्पण केले आहे. घटनेची माहिती होताच कारधा पोलीस स्टेशनचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक लांबाडे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविले. तर पाच वर्षीय मुलीला त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द करून पुढील तपास सुरू केला आहे.