महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Paddy Procurement Corruption : भंडाऱ्यात भ्रष्टाचाराचा नवा विक्रम, 6 तासांत केली 6 लक्ष क्विंटल धानाची खरेदी - भंडाऱ्यात धान खरेदी घोटाळा

केवळ 6 ते 7 तासांत तब्बल 6 लाख क्विंटल धान खरेदी मोठा भ्रष्टाचाराचा विक्रम भंडारा जिल्ह्यात झाला आहे. धान खरेदी केंद्राच्या संचालक आणि व्यापाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केला ( Paddy Procurement Corruption In Bhandara )आहे.

Paddy Procurement
Paddy Procurement

By

Published : Jul 8, 2022, 8:12 PM IST

भंडारा -केवळ 6 ते 7 तासांत तब्बल 6 लाख क्विंटल धान खरेदी मोठा भ्रष्टाचाराचा विक्रम भंडारा जिल्ह्यात झाला आहे. धान खरेदी केंद्राच्या संचालक आणि व्यापाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केला आहे. आता या भ्रष्टाचारी लोकांची चौकशीची खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे. त्यांची मागणीची दखल घेत जिल्हा मार्केटिंग कमिटीने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा माध्यमातून चौकशी सुरू केली आहे. गैर पद्धतीने नोंदणी करून भ्रष्टाचार करणाऱ्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर कारवाई होईल, असे संकेत जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिले ( Paddy Procurement Corruption In Bhandara ) आहेत.

106 खरेदी केंद्रावर झाली खरेदी -संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक धान्याचे उत्पन्न भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात होते. मात्र, राज्य शासनाच्या चुकीच्या माहितीमुळे खरेदीचे उद्दिष्ट कमी मिळाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन दोनदा कमी मिळालेले उद्दिष्ट केंद्राने वाढवून दिले. तिसऱ्यांदाही तीच वेळ आली. खासदार सुनील मेंढे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे उद्दिष्ट वाढवून घेतले. नव्याने सहा कोटी 41 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट भंडारा जिल्ह्याला मिळाले. या खरेदीला 7 जुलैच्या दुपारी बारा वाजता पासून सुरुवात झाली. शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून धान खरेदीसाठी असलेल्या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या सातबाराची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील 106 हून अधिक केंद्रावर एकाच वेळी सुरू झालेली खरेदी प्रक्रिया अवघ्या सहा ते सात तासांत संपली. कारण जिल्ह्याला असलेले उद्दिष्ट या कालावधीत पूर्ण झाले.

भंडाऱ्याचे खासदार आणि मार्केटिंग अधिकारी यांची प्रतिक्रिया

भ्रष्टाचाराचा चमत्कार - खरंतर हा एक प्रकारचा चमत्कारच म्हणावा लागेल. कारण कितीही प्रयत्न केले तरी धान खरेदी केंद्रात एका दिवसांत एका काट्यावर 700 क्विंटलच्या वर मोजणी होऊ शकत नाही. पण, असे असताना तुमसर तालुक्यातील एका केंद्रावर 15,490 क्विंटल, कुठे 9 हजार, कुठे 6 हजार तर कुठे 10 हजार क्विंटलची खरेदी करण्यात आली. 3000 क्विंटलच्या वर खरेदी करणाऱ्या केंद्रांची संख्या जवळपास 60 च्या घरात आहे. या विक्रमासाठी सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, या विक्रमी खरेदीतून धान खरेदीत बोकाळलेला भ्रष्टाचार उघड झाल्याचे बोलले जात आहे. केंद्रावर व्यापाऱ्यांनी आणलेल्या बोगस शेतकऱ्यांचे सातबारा नोंदवून धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले गेले असल्याचे समजते. यामुळे खरा आणि गरजवंत शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहिला आहे. ज्याच्यासाठी उद्दिष्ट वाढवून घेतले गेले तो हेतूच सफल न झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची बोळवण झाली हेच खरे.

खासदारांची कारवाईची मागणी - काही तासांत पूर्ण झालेले धान खरेदीचे उद्दिष्ट आश्चर्यकारक आहे. धान खरेदी केंद्र संचालकांच्या मदतीने खाजगी व्यापाऱ्यांची मनमानी यातून दिसून येते. या केंद्र चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा केंद्रावरील नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची यादी मागवून केंद्र संचालकांविरुद्ध तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन खासदार सुनील मेंढे शेतकऱ्यांना केलं आहे.

'खरेदीची चौकशी करुन कारवाई होणार' - एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळात झालेली खरेदी शंकेला वाव देणारी आहे. नक्कीच यात गोंधळ होण्याची शक्यता असून, याच्या तपासणीसाठी काही पथके तयार करून उपलब्ध आकडेवारीची सत्यता जाणून घेत आहेत. दोषी आढळल्यास केंद्रांवर कारवाई करू, असे स्पष्ट संकेत मार्केटिंग अधिकारी भारत भूषण पाटील यांनी दिले आहेत.

हेही वाचा -Uday Samant : शिवसेना पक्षावर दावा ठोकणार का?, उदय सामंतांनी स्पष्टचं सांगितलं...

ABOUT THE AUTHOR

...view details