महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात धान खरेदीमध्ये भ्रष्टाचार - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस लेटेस्ट न्यूज नागपूर

विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने भंडाऱ्यात आज मोर्चा काढण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात धान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. जे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, ते काही धनदांडग्यांनी मिळून लाटल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Jan 25, 2021, 4:47 PM IST

नागपूर - विविध मागण्यांसाठी भाजपच्या वतीने भंडाऱ्यात आज मोर्चा काढण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात धान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. जे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, ते काही धनदांडग्यांनी मिळून लाटल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

जिल्ह्यात धान घोटाळा झाला आहे. बोगस माल एफसीआयला देण्यात आला. शेतकऱ्यांचीही फसवणूक करण्यात आली. सत्ताधाऱ्यांच्या चेल्याचपाट्याने मिळून हा भ्रष्टाचार केला, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. याविरोधा आज भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

वीज बिलावरून फडणवीसांचा सरकारवर निशाणा

लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करू असे आश्वासन ऊर्जा मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर ऊर्जामंत्री राऊत यांना स्वतःच्याच आश्वासनाचा विसर पडला आहे. सरकारने वीज बिलावरून जनतेशी बेमानी केल्याचेही यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे.

भंडारा जिल्ह्यात धान खरेदीमध्ये भ्रष्टाचार

सरकारचा असंवेदनशीलपणा उघड

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्यानंतर १० निरागस बालके दगावली आहे. घटना अत्यंत गंभीर आहे. अद्यापही आरोपींवर गुन्हा दाखल झाला नाही, यावरून सरकारचा असंवेदनशीलपणा उघड होत असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -बाळासाहेबांच्या नावाला आमचा विरोध नाही पण... - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details