महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारामध्ये कोरोना रुग्णांच्या प्रमाणात वाढ; खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 पर्यंत आली होती. त्यामुळे येत्या काही दिवसात भंडारा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य येईल, अशी शक्यता असतानाच या आठवड्यातही संख्या पुन्हा दोन आकडी झाली आहे. सोमवारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 होती, तर मंगळवारी संख्या दुप्पट होऊन 21 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्हाधिकारी संदीप कदम
जिल्हाधिकारी संदीप कदम

By

Published : Feb 17, 2021, 6:57 AM IST

Updated : Feb 17, 2021, 7:46 AM IST

भंडारा- कोरोना महामारी सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूचा प्रसार अटोक्यात आलेला नाही. भंडारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुशे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. सध्या रुग्ण वाढीचे प्रमाण अत्यल्प असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. कोरोना गेला या भ्रमात न राहता पुढील काही दिवस तरी दक्षता घ्यावी लागणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

भंडारामध्ये कोरोना रुग्णांच्या प्रमाणात वाढ

कोरोनाची रुग्ण संख्या दोन अंकावर -

जिल्ह्यात मंगळवारी 15 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 12976 झाली असून आज 21 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13405 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.80 टक्के आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 पर्यंत आली होती. त्यामुळे येत्या काही दिवसात भंडारा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य येईल, अशी शक्यता असतानाच या आठवड्यातही संख्या पुन्हा दोन आकडी झाली आहे. सोमवारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 होती, तर मंगळवारी संख्या दुप्पट होऊन 21 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

आजपर्यंत जिल्ह्यत 13405 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह-

मंगळवारी 564 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 21 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत 1 लाख 23 हजार 961 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 13405 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्ह्यात मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 12, मोहाडी 04, तुमसर 02, पवनी 00, लाखनी 01, साकोली 02 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 12976 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 13405 झाली असून 103 क्रियाशील रुग्ण आहेत. मंगळवारी कोरोनामुळे एकही रुग्ण दगावला नसून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 326 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.80 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्यूदर 02.43 टक्के एवढा आहे.

नागरिकांनी नियमांचे पालन करावे-

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची दृष्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन करण्याचे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी हलगर्जीपणा न करता कोविड-१९ च्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला केले आहे. तसेच महाराष्ट्र अनलॉक होत असतांना लग्न समारंभ, गर्दीची ठिकाण, बाजारपेठ अशा ठिकाणी नागरिक नियमांचे पालन न करता वावरताना आढळतात, ही गंभीर असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्ह्याधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्यात अगोदर सतर्क व्हावे-

तापासरखी लक्षण आढळून आल्यास घरच्या घरी औषध घेण्याचे कृपया टाळण्याचे आवाहन करत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या खूप ज्यास्त नसली तरी राज्यात आणि विशेषतः जिल्ह्यालगत असलेल्या नागपूर मध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी व दक्षता घेतली पाहिजे, अ

Last Updated : Feb 17, 2021, 7:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details