महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 19, 2022, 8:55 PM IST

ETV Bharat / state

भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेजवळ, महाविकास आघाडी पॅटर्न होणार का?

बहुमताजवळ असलेली काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची मदत घेऊन सत्ता स्थापन करणार आहे ( Bhandara local body election ) का? अपक्ष आणि वंचित आणि बहुजन समाज पार्टीची मदत घेऊन सत्ता स्थापन करणार आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर 3 नगरपंचायतपैकी मोहाडी आणि लाखांदूर येथे भाजपने बहुमत मिळविले. तर लाखनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी ही बहुमताच्या जवळ ( Lakhana nagarpanchayat election ) पोहोचली आहे.

भंडारा जिल्हा परिषद
भंडारा जिल्हा परिषद

भंडारा - जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भंडारा जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस बहुमताच्याजवळ पोहोचली ( congress majority in Bhandara election ) आहे. तरी सत्ता स्थापन करण्यासाठी भंडारा जिल्हा परिषद काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष ( Bhandara local body election result ) लागलेले आहे.

बहुमताजवळ असलेली काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची मदत घेऊन सत्ता स्थापन करणार आहे ( Bhandara local body election ) का? अपक्ष आणि वंचित आणि बहुजन समाज पार्टीची मदत घेऊन सत्ता स्थापन करणार आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर 3 नगरपंचायतपैकी मोहाडी आणि लाखांदूर येथे भाजपने बहुमत मिळविले. तर लाखनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी ही बहुमताच्या जवळ ( Lakhana nagarpanchayat election ) पोहोचली आहे.
हेही वाचा-NCP Shivsena Allience in GOA Election : गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती; उत्पल पर्रिकरांबाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

भंडारा जिल्ह्याच्या 52 जागांपैकी काँग्रेसने 21 जागांवर विजय मिळवत सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. असे असले तरी सत्ततेसाठी लागणारा आकडा गाठण्यासाठी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष, वंचित किंवा बहुजन समाज पार्टी यांची मदत घ्यावी लागेल. काँग्रेस खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला 12 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर शिवसेनेने एका ठिकाणी विजय मिळवित खाते उघडले आहे. तसेच वंचित आणि बहुजन समाज पार्टी यांचाही एक एक उमेदवार निवडून आलेला आहे.

हेही वाचा-Corona Spread in Nagpur Police : नागपूर पोलीस दलातील 350 अधिकारी-कर्मचारी कोरोना बाधित - पोलीस आयुक्तांची माहिती

तीन नगर पंचायतीमध्ये भाजपला 2 जागांवर विजय-
मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर या तीन नगर पंचायतीचे सुद्धा निकाल आले आहेत. लाखांदूर येथे 17 पैकी नऊ ठिकाणी भाजपाचे, काँग्रेस 6 अपक्ष 2 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे लाखांदूर येथे भाजपची एक हाती सत्ता आली आहे.
मोहाडी येथे सुद्धा 17 पैकी भाजपचे 9 उमेदवार, राष्ट्रवादीचे 6 व काँग्रेसचे 2 उमेदवार निवडून आले आहेत. येथेही भाजपाने एक हाती सत्ता मिळविलेली आहे. तर लाखनी नगरपंचायतीमध्ये 17 पैकी भाजप 6, राष्ट्रवादी 8 काँग्रेस 2 अपक्ष 1 निवडून आले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे.

हेही वाचा-Goa Assembly Election : 'आप'कडून अमित पालेकर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

पंचायत समितीच्या निकाल कोणाच्या बाजूने?
भंडारा जिल्ह्यातील 7 पंचायत समिती निवडणुकीमध्ये भंडारा पंचायत समितीच्या 20 जागेपैकी राष्ट्रवादी 6, भाजप 7, काँग्रेस 4, सेना 1, आणि अपक्ष 2 ठिकाणी निवडून आले आहेत. तुमसर पंचायत समितीमध्ये 20 पैकी भाजपा 10 राष्ट्रवादी 6, काँग्रेस 3 आणि शिवसेना एका जागेवर निवडून आलेली आहे. तर लाखांदूरमध्ये भाजपा 9 काँग्रेस 6 अपक्ष 2 ठिकाणी निवडून आलेले आहेत.

साकोली पंचायत समितीमध्ये काँग्रेसने 12 पैकी 9 जागांवर विजय

मोहाडी पंचायत समितीमध्ये भाजप 8 आणि राष्ट्रवादी 6 ठिकाणी निवडून आलेली आहे. लाखनी पंचायत समितीमध्ये काँग्रेस 6, भाजप 1 आणि अपक्ष 1 ठिकाणी निवडून आलेला आहे. साकोली पंचायत समितीमध्ये काँग्रेसने 12 पैकी 9 जागेवर विजय मिळवला आहे. तीन अपक्ष उमेदवारांनीही बाजी मारली आहे. तर पवनी पंचायत समितीमध्ये काँग्रेस 6 राष्ट्रवादी 3, भाजप एक आणि सेना 3 आणि बीएसपी 1 जागेवर निवडून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details