भंडारा -अखेर भंडारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरला आहे. काँग्रेसने भाजपाच्या एका गटाशी युती ( BJP Congress alliance Bhandara ZP ) केली असून अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे ( Gangadhar Jibhakate Congress for post ZP President ), पंकज राहागडाले तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपाचे संदीप ताले यांची निवड झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांच्यासाठी अस्थितीत्वाची लढाई ठरलेल्या या निवडणुकीत नानांनी स्वतःचे पद वाचविण्यासाठी भाजपाच्या कुबड्या घेतल्या आहेत. त्यामुळे या नवीन युतीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
गंगाधर जिभकाटे यांनी काँग्रेस तर्फे तर भाजपा तर्फे संदीप टाले यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे 21 सदस्य निवडून आले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 सदस्य निवडून आले होते. त्यामुळे आघाडी धर्म निभावले जाईल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होईल असे वाटत होते. मात्र नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या अध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाशी हात मिळवणी करून 7 पैकी 4 ठिकाणी काँग्रेसला सत्ते बाहेर ठेवले होते. त्याचाच वचपा काढत आज झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपाच्या नाराज माझी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील 12 पैकी 6 मते फोडली आणि त्याच्या साहाय्याने अध्यक्ष पद आपल्या पदरी पाडून घेतले. या निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांना 27 मते तर भाजपाचे संदीप टाले यांना 27 मते मिळवून विजय मिळविला.