महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

. . अखेर सनफ्लॅग कंपनी 10 दिवस बंद; नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश - update corona news in bhandara

मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीमध्ये दहा दिवसाअगोदर कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर कंपनीत सामूहिक संसर्ग वाढला आणि कंपनी बंद करण्याची मागणी सरपंचांनी केली.

bhandara
सनफ्लॅग कंपनी

By

Published : Aug 20, 2020, 7:30 PM IST

भंडारा - अखेर सनफ्लॅग कंपनी दहा दिवसासाठी बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढला आहे. मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीमध्ये दहा दिवसाअगोदर कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर कंपनीत सामूहिक संसर्ग वाढला आणि कंपनी बंद करण्याची मागणी सरपंच, राजकीय लोक यांनी केली. माध्यमांनी बातम्याही लावल्या मात्र जे जून्या जिल्हाधिकार्‍यांना जे जमले नाही ते नुकतेच दोन दिवसाअगोदर आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखविले आहे.

भंडारा जिल्ह्यात मागच्या एक महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. त्यात मोहाडी तालुक्यातील रुग्णांची संख्याही दुपटीने वाढत होती. ही सर्व रुग्ण कंपनीतील कार्यरत कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक होते. जिल्ह्यातील विविध तालुक्यातून नागरिक कंपनीत कामासाठी येत होते. संपूर्ण जिल्ह्याचे आरोग्य धोक्यत आले होते. त्यामुळे ही कंपनीत काही काळ बंद ठेवून होणारा प्रादुर्भाव थांबवावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना वरठीच्या सरपंचांनी केली. काही राजकीय पक्षांनीही जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन ही कंपनी काही दिवसांसाठी बंद ठेवण्याची मागणी केली.

माध्यमांनी तशा बातम्याही लावल्यात. मात्र जुने जिल्हाधिकारी एम प्रदीपचंद्र यांना या विषयात अजिबात गांभीर्य दिसले नाही. पण दोन दिवस आगोदर आलेले नवीन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून सनफ्लॅग कंपनी 20 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश काढले. या आदेशांतर जुन्या जिल्हाधिकार्यांना जमलं नाही ही ते नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी करून दाखविले अशी चर्चा या परिसरात आहे.

सॅनफ्लॅग कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जी पणामुळे गावात कोरोना बाधिताांची संख्या वाढली. सॅनफ्लॅग कंपनीतील कामगार व त्यांच्या संपर्कातील नागरिक कोरोनाला बळी पडले. यामुळे कामगारांसह नागरिकांत कमालीची दहशत आहे.

कोरोना हे आजार लक्षण विरहित असल्याने सहजासहजी कोरोना बाधित व्यक्ती समजणे पलीकडचे आहे. सध्या गावात वातावरण तापले आहे. कंपनी 10 दिवस बंद असली, तरी मात्र या काळात कोरोनाचा कहर टाळण्यासाठी नियमित कामावर जाणारे कामगार व त्यांंच्या संपर्कात येणाऱ्यांनी स्वतःला 10 दिवस क्वारंटिन करून घ्यावे. आजार अंगावर न काढता तत्काळ आरोग्य तपासणी करून शक्य तेवढ्या लवकर उपचाराला प्राधान्य द्यावे असे आवाहन सरपंच श्वेता येळणे व उपसरपंच सुमित पाटील यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details