बुलढाणा:महाविकास आघाडी सरकार मधुन बाहेर पडा भाजप सोबत युती करा अशा मागण्या करत एकनाथ शिंदेंनी शिवसेने विरोधात बंड पुकारले समर्थक आमदारांचा एक गट सोबत घेत सुरत मार्गे गुवाहाटी गाठले महाराष्ट्रात राजकीय पेच तर शिवसेनेत भुकंप झाला. पाहता पाहता शिवसेनेतील जवळपास 40 आमदार शिंदे गटाला मिळाले. शिवसेनेत उभी फुट Thackeray Shinde dispute पडली शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटातील Shiv Sena Shinde Thackeray group वाद कायम समोर येत आहे. शिंंदे गटाकडून ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेची अडवणुकीची एकही संधी सोडली जात नाही. हा वाद Thackeray Shinde group dispute आता राज्यातील कार्यकर्त्यांमधेही पहायला मिळत आहे आणि तो हाणामारी आणि गंभीर स्वरुपाच्या धमक्यां Clashes and serious threats पर्यंत पोचला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार नुकताच बुलढाण्यात पहायला मिळाला. याठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार सुरु होता. यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते असे सगळे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी झालेल्या राड्यात लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. तगडा पोलीस बंदोबस्त असताना हा प्रकार झाला. संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले की हल्ला करणाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि त्यांचे सहकारी आघाडीवर होते. त्यांनी ठाकरे गटाचा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.