भंडारा - संचारबंदीमध्ये जिल्ह्यात अडकलेल्या कामगार, प्रवासी, विद्यार्थी तसेच इतर नागरीकांची माहिती एकत्रित करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. भंडारा जिल्ह्याबाहेर आणि जिल्ह्यात येणाऱ्या इच्छुकांनी आपली नावे प्रशासनाकडे नोंदवावित, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी केले आहे. सदर नावांची यादी शासनाकडे पाठविण्यात येत आहे. लवकरच राज्य शासनाकडून याबाबत तातडीने प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे संबंधित नागरीकांनी काळजी न करता आपण आहे त्या ठिकाणी थांबून सहकार्य करावे. आम्ही तुम्हाला प्रवासाच्या परवानगीबाबत दिलेल्या संपर्क क्रमांकावर कळवणार आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रशासनाकडे या प्रकारे करा आपल्या प्रवासाची नोंदणी :
ज्यांना जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात यायचे आहे, त्यांनी पुढील कोणत्याही एका प्रकारे माहिती नोंदवावी,
वेबसाईट : bhandara.gov.in जिल्हाधिकारी भंडारा प्रशासनाच्या वेबसाईटवर आपण आपली माहिती भरू शकता.
दूरध्वनी : ०७१८४ २५१२२२ जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या क्रमांकावर दूरध्वनी करून आपण माहिती देवू शकता.
ईमेल : bhandaraddmo@gmail.com जिल्हा प्रशासनाच्या ईमेलवर नाव, सध्याचे ठिकाण व कुठे जावयाचे आहे. तसेच संपर्क क्रमांक, अशी माहिती पाठवावी.
हेही वाचा...केंद्राने 'आयएफसी' स्थलांतरित करण्याचा निर्णय मागे घ्यावा - अरविंद सावंत
प्रवासाठी लागणाऱ्या ई-पास साठी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी :
जिल्हा अंतर्गत आणि बाहेर प्रवासासाठी परवानगी दिलेल्या ठिकाणी जाण्याकरीता ई-पास आवश्यकच आहे. यासाठी शासनाच्या covid19.mhpolice.in या वेबसाईटवर अर्ज करणे पुर्वीप्रमाणेच आताही आवश्यक आहे. फक्त परवानगीबाबत जिल्हाधिकारी यांना अधिकार देण्यात आले आहेत. संकेतस्थळावर अर्ज केल्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी करता प्रत्यक्ष न येता ०७१८४ २५१२२२ या क्रमांकावर ई-पास बाबत चौकशी करावी.