भंडारा शहरात अधिकारी कोमात, नियम तोडणारे जोमात
तुम्ही तुमचेच रक्षक, असे म्हणत शहरातील लोकांवरील प्रशासनाने आपले पूर्ण नियंत्रण काढले आहे असे चित्र सध्या आहे. अधिकाऱ्यांनी काढलेले आदेश सध्या फाईल मध्ये बंद करून कपाटात ठेवण्यात आले आहे. नियम तोडणाऱ्यांमुळें आणि कार्यव्यापासून दूर पडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचार्यांमुळे जिल्ह्याला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागू शकते. तेव्हा या साठी जवाबदार कोणला धरल्या जाईल आदेशाचे पालन न करणाऱ्यांना की त्यांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या प्रशकीय यंत्रणेला.
भंडारा - चौथ्या लॉकडाऊननंतर बऱ्याच बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली. मात्र, त्यासाठी काही नियम बनवले गेले आणि तसे आदेश जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी यांच्या मार्फत काढण्यात आले. मात्र,अधिकारी कोमात आणि नियम तोडणारे जोमात, अशी परिस्थिती भंडारा शहरातील झालेली आहे. अधिकाऱ्यांनी आदेश तर काढले मात्र, त्याचे पालन होताना दिसत नाही. तरीही नियमांचा भंग करणाऱ्या लोकांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याच गोष्टीचा फायदा घेत पान टपऱ्या आणि हात गाडीवाले यांनीही आदेश नसताना आपले व्यवसाय सुरू केले आहेत.