महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझ्या आरोपांना उत्तर देताना आमदार राजू कारेमोरे शुद्धीवर नसतील' - भंडारा जिल्हा बातमी

माजी आमदार चरण वाघमारे यांनी विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यावरून आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

Charan Waghmare
चरण वाघमारे

By

Published : Feb 24, 2020, 7:42 PM IST

भंडारा- तुमसर विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदारांचे भांडण हे सर्वश्रुत आहे. या दोघांमध्ये कायम शाब्दिक युद्ध सुरू असते. तर 2 दिवसांपूर्वी विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांनी माजी आमदार चरण वाघमारे यांना पिसाळलेला कुत्रा म्हटले होते. त्यावर उत्तर देताना आज वाघमारे यांनी विद्यमान आमदार शुद्धीवर नसल्याने अशा पद्धतीचे वक्तव्यं केले असल्याचा टोला लगावला आहे. तसेच विधानसभेत घेतलेली शपथसुद्धा कारेमोर यांच्या लक्षात नसल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे.

चरण वाघमारे, माजी आमदार

माजी आमदार चरण वाघमारे यांनी विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. कोरेमोरे यांनी धान खरेदी केंद्र देताना सर्व नियम धाब्यावर बसवल्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वाघमारे यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना कारेमोरे यांनी वाघमारे यांना चक्क पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिली.

त्यानंतर वाघमारे यांनी आमदार राजू कारेमोरे हे शुद्धीवर नसतील म्हणूनच त्यांनी ही भाषा वापरली आहे. शुद्ध हरवलेल्या या आमदाराने संविधानानुसार त्यांनी घेतलेल्या शपथेचाही मान ठेवलेला नाही, अशी बोचरी टीका केली. तसेच राजू कारेमोरे यांच्या आरोपानुसार मी जर पिसाळलेला कुत्रा असेल, तर मी त्यांच्या मतदारसंघातला व्यक्ती असल्याने त्यांनी माझा उपचार करून मी पिसाळलेला आहे, हे सिद्ध करावे, असे आव्हान वाघमारे यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details