भंडारा - जिल्ह्यातील पुरुषोत्तम चौधरी या अवलियाने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी ( Special Birthday Celebration ) सलग दीड तास तब्बल 2550 दंड मारून आपला सुवर्ण वाढदिवस साजरा केला. याअगोदर 1450 दंड मारून लिमका बुकमध्ये स्वतःचे नाव नोंदविणाऱ्या पुरुषोत्तमने आज 2550 दंड मारून स्वतःचा जुना रेकॉर्ड मोडला आहे. एवढे दंड सलग मारणारे ते जगातील एकमेव व्यक्ती असतील मात्र आर्थिक कारणामुळे त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांच्या नावाची नोंद करता आली नसल्याची खंत आहे. तरी भविष्यात फी जमा करणे एवढा पैसा जमा झाल्यास नक्कीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करू असा निश्चय त्यांनी केला आहे.
वयाच्या 14 वर्षापासून व्यायाम शाळेत -पुरुषोत्तम चौधरी हे सर्वसामान्य कुटुंबातील असून वयाच्या 14 वर्षापासून त्यांनी बहिरंगेश्वर व्यायाम शाळेत जाण्यास सुरुवात केली. दररोज न चुकता व्यायाम शाळेत जाऊन त्यांनी शरीर सुदृढ केले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी ही ते दररोज व्यायाम करण्यासाठी जातात आणि कमीत कमी हजार ते बाराशे दंड ही नियमित घालतात.
2250 दंड बैठका घालून केला 50 वा वाढदिवस साजरा 2012 मध्ये लिम्का बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये नाव -पुरुषोत्तम यांना दंड पेलण्याची ही आवड वाढतच गेली आणि त्यानंतर 8-1- 2012 रोजी त्यांनी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यासाठी ठरविले. यासाठी त्यांनी दीड तासांमध्ये 1450 दंड घालून स्वतःचा नाव लिम्का बुक मध्ये नोंदविला.
2017मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न - लिम्का बुकमध्ये नाव आल्यानंतर पुरुषोत्तम चौधरी यांनी स्वतःवर अजून मेहनत घेण्यास सुरुवात केली आणि कमी वेळात जास्त दंड मारण्याचा सराव त्यांनी सुरू केला. या सरावानंतर 27 एप्रिल 2017 रोजी त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी दीड तासात 1950 दंड घातले हे सर्व रेकॉर्डिंग त्यांनी लंडनला पाठविली मात्र तिथे लागणारी फीस ते भरून न शकल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यासाठीचे स्वप्न त्यांचे अजूनही अपुरे राहिले आहे.
50 वा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा -पुरुषोत्तम चौधरी आज पन्नास वर्षाचे झाले. वयाच्या सवर्ण महोत्सव सर्व भंडारा वासियांना सदैव लक्षात राहावं आणि आरोग्य विषयक संदेश सर्वांना जावयासाठी पुरुषोत्तम चौधरी यांनी त्यांच्या व्यायामशाळेत जास्तीत जास्त दंड घालण्याचा निर्णय घेतला. 25 तारखेला पहाटे पाच वाजेला पुरुषोत्तम चौधरी सह त्यांचे गुरू आणि हे भंडारा शहरातील नागरिक हे बहिरंगेश्वर व्यायाम शाळेमध्ये पोहोचले. पहाटे साडे पाच वाजेपासून पुरुषोत्तम यांनी दंड घालण्यास सुरुवात केली जवळपास दोन हजार दंड घातल्यानंतर त्यांच्या अंगावरचा घाम आणि शरीराचा थकवा पाहून प्रत्येकांना आता पुरुषोत्तम थांबेल अशी अपेक्षा होती. मात्र पुरुषोत्तम यांनी त्यानंतरही पाचशे दंड मारले 2500 दंड झाल्यावर सर्वांनी त्यांचा टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केला. मात्र पुरुषोत्तम यांनी इशारा करून पुन्हा पन्नास दंड मारण्याचा निर्धार केला आणि अशा प्रकारे 2550 दंड त्यांनी दीड तासात पूर्ण केले. उपस्थित सर्व नागरिकांनी पुरुषोत्तम यांचा उत्साह पाहून आणि त्यांनी केलेली कामगिरी पाहून टाळ्यांच्या गजरात यांचा अभिनंदन केला.
शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी माजी आमदारांची मागणी -पुरुषोत्तम चौधरी यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे हे सुद्धा उपस्थित होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आजचे नागरिक विविध आजारांनी ग्रस्त असतात अशात पुरुषोत्तम चौधरी यांनी आजही शारीरिक दृष्ट्या किती सुदृढ आहेत हे दाखवून दिले. त्यांचे हे कार्य तरुणांना नक्कीच प्रोत्साहित करेल. या कर्तुत्ववान व्यक्तीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पोहोचले नाही ही खेदाची बाब आहे शासनाने नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून पुरुषोत्तम चौधरी यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी यावेळी माजी आमदार चरण वाघमारे यांनी केली आहे. जिल्ह्यात बरेच मोठे नेते आहेत त्यांनीही पुरुषोत्तम चौधरी यांच्या पाठीशी आर्थिकदृष्ट्या उभे राहावे तसेच येत्या काळात मी आणि भंडारा जिल्ह्यातील नागरिकांच्या माध्यमातून पैसे एकत्र करून पुरुषोत्तम चौधरी यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी पाठवू असं चरण वाघमारे यांनी सांगितले. माझे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जरी दर्द करू शकलो नसलो तरी जगातील सर्वाधिक दंड मारणारा व्यक्ती मी आहे. याचाच मला आनंद असल्याचा पुरुषोत्तम यांनी सांगितले मात्र संधी मिळाल्यास नक्कीच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -Jitendra Awhad on MLA Home : ग्रामीण भागातील आमदारांना घरासाठी मोजावे लागणारे एक कोटी रुपये