भंडारा - महिला पोलीस अधिकाऱ्याशी अर्वाच्य भाषेचा वापर करत गैरवर्तन केल्याने तुमसरचे आमदार चरण वाघमारे तसेच भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्या विरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आमदार वाघमारेंनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा - संतापजनक! आदिवासी विवाहितेची सामूहिक बलात्कार करून हत्या
सोमवारी (१६ सप्टेंबर)ला तुमसर बाजार समितीमध्ये कामगारांसाठी सुरक्षा किट वाटपाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी उपस्थित महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे उपस्थित एका गर्भवती महिलेला अशा परिस्तिथी घरी कशी जाशील? असे विचारले असता, तिथे उपस्थित भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांच्या घरी पेटी पोहोचवून देणार असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना असे न बोलण्याची विनंती केली. मात्र, जिभकाटे यांनी थेट भांडणाला सुरुवात करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यानंतर तिथे आमदार चरण वाघमारे आले आणि त्यांनीही त्या महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत बोलले आणि नंतर अनिल जिभकाटे यांनी महिला अधिकाऱ्याचे हात पकडून धक्का दिला.