महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CORONA : कोरोनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्या ग्रा. पं. सदस्यासह तिघांवर गुन्हा दाखल - case filed against gram panchayat member

जिल्ह्यात परदेशातून 8 लोक आले असून यापैकी 4 जण हे कोरोना संशयित रुग्ण आहेत, असा मेसेज सुरुवातीला पसरविण्यात आला. यानंतर एका न्यूज चॅनलच्या लोगोचा उपयोग करीत खोटा मेसेज लिहीत तालुक्यात एक कोरोना ग्रस्त रुग्ण असल्याची माहिती पसरविली. जवाहर नगर येथील ग्रामपंचायत सदस्य नावाने एक मॅसेज पसरविण्यात आला. यामध्ये जवाहर नगरमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती या मेसेजमध्ये लिहिण्यात आली होती.

bhandara
CORONA : कोरोनाच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्या ग्रा. प. सदस्यासह तीघांवर गुन्हा दाखल

By

Published : Mar 18, 2020, 8:53 AM IST

भंडारा -समाज माध्यमातून कोरोना विषाणूच्या संदर्भात खोट्या अफवा पसरवणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यासह तीघांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, अशा अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम मागील दोन दिवसांपासून या समाज कंटकांनी सुरू केले होते. जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसताना 16 (मार्च) तारखेपासून काही समाजकंटकांनी समाज माध्यमांवर कोरोना विषयी खोटी माहिती पसरवण्याचे काम करत होते.

हेही वाचा -कोरोना: आजपासून शाळा, कॉलेज बंद, रविवारी आदेश निघाल्याने विद्यार्थी पोहोचले शाळेत

जिल्ह्यात परदेशातून 8 लोक आले असून यापैकी 4 जण हे कोरोना संशयित रुग्ण आहेत, असा मेसेज सुरुवातीला पसरविण्यात आला. यानंतर एका न्यूज चॅनलच्या लोगोचा उपयोग करीत खोटा मेसेज लिहीत तालुक्यात एक कोरोना ग्रस्त रुग्ण असल्याची माहिती पसरविली. जवाहर नगर येथील ग्रामपंचायत सदस्य नावाने एक मॅसेज पसरविण्यात आला. यामध्ये जवाहर नगरमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती या मेसेजमध्ये लिहिण्यात आली होती.

हेही वाचा -'ते' करत आहेत कॉकरेल कोंबड्यांना मुक्त संचार पद्धतीने जगवण्याचा प्रयत्न

तर 17 तारखेला पुन्हा एका टीव्ही चॅनलच्या लोगोवर खोटी माहिती लिहीत तुमसर तालुक्यात पाथरी गावात एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची खोटी माहिती देण्यात आली. कोरोना बाधित रुग्ण नुकताच आढळल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून जिल्ह्यातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा खोटा मेसेज पुन्हा पसरविण्यात आला. या सर्व खोटे मेसेजमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी या सर्व प्रकाराला गांभीर्याने घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा -पुढच्या पाच दिवसात जिल्हायात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता..

भंडारा तहसीलदारांनी भंडारा पोलीस स्टेशनमध्ये सावरी येथील ग्रा. प. सदस्य संतोष ठवकरसह दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर तुमसर तहसीलदराने गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्ती विरुद्ध कोरोना बाबत समाज माध्यमांवर अफवा आणि गैरसमज पसरविणाऱ्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच भारतीय दंड संहिता 860 नुसार गुन्हा नोंद केला आहे. जिल्ह्यातील ही पहिली कायदेशीर कार्यवाही आहे. या कारवाईनंतर असा खोट्या अफवा पसरविणाऱ्या समाजकंटकाना आळा बसेल.

ABOUT THE AUTHOR

...view details