अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या साकोली नगराध्यक्षासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल - भंडारा अतिक्रमणविरोधी पथक
अतिक्रमण काढताना अडवणूक करणाऱ्या 13 लोकांवर अखेर साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्षांसह १३ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साकोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी स्वतः साकोली पोलीस ठाण्यात या १३ लोकांविरुद्ध तक्रार दिली होती.
![अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्या साकोली नगराध्यक्षासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल opposing the removal of the encroachment](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11946409-1062-11946409-1622294212890.jpg)
भंडारा - अतिक्रमण काढताना अडवणूक करणाऱ्या 13 लोकांवर अखेर साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्षांसह १३ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साकोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी स्वतः साकोली पोलीस ठाण्यात या १३ लोकांविरुद्ध तक्रार दिली होती. नगराध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
एका घराचे अतिक्रमण काढताना वाद -
साकोली येथील हरीश पोगडे यांनी नालीवर अतिक्रमण करून बांधकाम केले होते. 21 मे ला साकोली नगर पालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मळावी व त्यांच्यासह पथक अतिक्रमण काढण्यासाठी पोगडे यांच्या घरी पोहोचले. त्या अगोदर त्यांना नोटीस देऊन स्वतः अतिक्रमण काढण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली गेली होती. मात्र पोगडे यांनी अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे त्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेची टीम पोहोचली मात्र अतिक्रमण काढू नये, यासाठी हरीश पोगडे आणि त्यांच्या परिवाराने विरोध केला. पोगडे यांची पत्नी स्वतः नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूने नगराध्यक्षा आणि इतर नगरसेविका आणि भाजप कार्यकर्ते पोहोचले. त्यानंतर मुख्याधिकारी माधुरी मडावी आणि अतिक्रमण तोडू न देणार्या लोकांमध्ये वादावादी झाली. शेवटी माजी आमदार बाळा काशीवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर चार दिवसांची मुदत देऊन अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवली.