भंडारा - जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात 10 शेतकऱ्यांचा जीव थोडक्यात वाचला. तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीला मंगळवारी सकाळी अचानक पूर आल्याने नदी पार करणारी नाव बुडायला लागली. नावाडाने प्रसंगावधान साधत नाव एका मोठ्या खडकाला अडकवली. त्यामुळे सर्व 10 ही शेतकरी यांना खडकाचा आधार मिळाला. गावकऱ्यांनी दुसऱ्या नावेने सर्व शेतकर्यांना सुखरूप नदी बाहेर काढले. ( Boat stuck in chulband river in Bhandara )
शेतीवर जात होते कामासाठी -लाखांदूर तालुक्यातील सोनी आवळी हे गाव वैनगंगा व चुलबंद नदीने व्यापले आहे. त्यामुळे या गावाचा पुनर्वसन झाला आहे. मात्र शेतकऱ्याच्या शेती असल्यामुळे शेतकरी चुलबंद नदीतून ये जा करत असतात. सध्या शेतीचे हंगाम सुरू असल्याने मंगळवारी सकाळी महिला आणि पुरुष असे 10 शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी नावेत बसले होते. मात्र नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली पाण्याचा प्रवाह वाढल्याने नाव बुडू लागली. अशातच नावाडी नारायण कुंभरे यांनी प्रसंगावधान राखत एका मोठ्या दगडाला अडकवली त्यामुळे 10 शेतकरी नदीत आडकुन राहिले.